Bluepad | Bluepad
Bluepad
ते दिवस...काय दिवस होते...
A
Ashu
23rd Jun, 2022

Share

वो शहर सच में कमाल का था यार..... जहा हमने हमारे जिंदगी के सबसे हसीन पल गुजारे...
वो महेफील भी हसीन हूआ करती थी..जहा हसणे के लिये जोक की दरखास्त नहीं तो, साले कमीने दोस्त ही काफि थे..
वो गलीया भी लाजवाब थी, जहा हमारी बातो की महेफील सजा करती थी...
ना किसी की परवा..हा थोडी सी समजदारी और नादान परिंदो की अजादी थी... बस कहू तो मन चला एक सफर था.. अभी तो सिर्फ एक गुजरा हुआ कारवा हैं.. यादो में बसता एक सिलसिला...
ते दिवस...काय दिवस होते...
कॉलेज कट्टा. माझ्या आयुष्यातील सर्वात छान दिवस .बारावी पास झाले अन् पुढील. शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी गेले. सगळं काही नवीनच अन् त्या मध्ये स्वत: ला मिसळून घेणं म्हणजे कठीणच.
ऋतुजा माझी पहिली कॉलेज मैत्रिण .दिसायला छान , लंबे कंबरेपर्यंत तिचे केस, राहणीमान हि साधारणचं, स्वभावला ही मस्त , चला आमचं छान जमायला लागलं . कॉलेज मध्ये मी नवीन तसेच बाकी मूल व मुली पण नवीनच. ऋतुजा अन् मी आम्ही सोबत खोली केली राहायला. अभ्यास,जेवण, कॉलेज ला जान येणं आमचं नियमीत चालायचा.तसेच अजून पूजा,शीतल, अश्विनी, सोनम , मयुरी ...असा आमचा ग्रुप जमला एक कुटुंब च म्हणावं.
सुट्टीच्या दिवशी आम्ही छान जेवणाचा बेत अखायचो. ते करत असताना मज्जा मस्ती पण चालायची . कोणा एकीला शब्दात पकडायचा अन् तिची चांगली खेचायची . कधीतरी निवांत बाहेर ही जायचो मटकुन छान छान फोटो काढायला.
निवांत शांत अन् थोडसं बेशिस्त ते वय होत . खिशात जास्त पैसे नसायचे म्हणून चौकातली पाणी पुरी, अन् आमचं गोल्डन टी म्हणजे कोरा दुधाचा चहा आमची पार्टी बनुन जायचा. चहा वरून आठवलं कॉलेज जवळच एक चिंचेचं झाड होत. अन् तिथे एका मावशीची चहाची छोटीशी हॉटेल. टेन्शन असो,किंवा आनंदी,की कोणाला पार्टी देयची आहे,किंवा काहीतरी चर्चा करायची असेल, तर आमची यती जागा ठरलेली.. तो आमचा कट्टा च झालेला. मावशी सोबत पण चांगलीच गट्टी जमलेलि. परीक्षेचा अभ्यास अख्खी रात्र जागून काढायचो . एकमेकींच्या चढाओढीत पेपर पण पास करून जायचो.
एकीची तबीयत ठिक नाही म्हणून सगळयानीच कॉलेज ला दांडी मारायचो.. व दावाखण्यात अगदी घरच्या सारखी काळजी घेयचो. शेवटी एक कुटुंबच चार वर्षे सोबातीचे.
ती जागा, गाव, कॉलेज, तिथली माणसं सगळाच आता मोबाईल, फोटो, मनामध्ये आठवणीत जपून आहे .वेळ परत आणता येत नाही, म्हणून तो क्षण आजचा क्षण हा आनंदानी जागून घ्या . कारण आयुष्यात आपण जबाबदारी च्या पात्रात गेलो की आपण अनुभवलेले क्षण खरच किती आनंद देऊन जाणारे होते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधून आपण एकमेकांना किती आनंद देयचो हे कळते . पण आपल्या कडे वेळ च नसतो .जुन्या आठवणी मध्ये रमायला, परत ते दिवस अनुभवयाला. सगळे जण आप आपल्या आयुष्यात व्यस्त असतात. कधीतरी वेळ काढून जुन्या मैत्रिणीला फोन केला तेच फार कठीण. कारण काय तर वेळच नाही.
तुम्ही पण तुमचे कॉलेज चे दिवस असेच काहीतरी गंमती जमती मध्ये काढलेले असणार, मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा..
खरच काय कमाल असते ना त्या वेळेत , मनमोकळ, बिनधास्त, थोडीशी शिस्त तर , काही बेशिस्त ,तर थोडीशी धास्ती. मोकळं भन्नाट आकाश त्यात भरपूर स्वप्न बघून उडायची जब्बर महत्वकांक्षा.

168 

Share


A
Written by
Ashu

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad