Bluepad | Bluepad
Bluepad
देवा बर झाल तु कोणत्याही वाहिनीवर दिसलास नाही.
श्री.सी.एस.कदम
श्री.सी.एस.कदम
23rd Jun, 2022

Share

देवा बर झाल तु कोणत्याही
वाहिनीवर दिसलास नाही.
इथे तुझ प्रस्थान असुन देखील
सत्तेतल्या उन्मत्त सत्ताधार्‍याना
ठळक बातम्यांमध्ये दिसण्याचा
मोह आवरता आला नाही.
पंढरीत तुज्या पूजेसाठी दिंडीतल्या
वारकर्‍यां सारखा पवित्र आत्मा नाही.
मंत्री येतात जातात, वाहिन्यांवर जग
प्रसिद्ध होण्यासाठी आरतीचा मान
मिळवितात
सत्तेत असणार्‍यांना देव कळत नाही,
लाखोंची गर्दी तुज्यासाठी पायपीट करते
भक्तीत तल्लीन होवुन नामदेव पायरी
पाहुन धन्य धन्य होते.
कोणी रचला हा पायडा कळत नाही.
एसी गाडीतून येणार्‍याला मान मिळतो
देवा खरच सांगु रुचत नाही.
आम्हाला मान् हवा हा हव्यास नाही.
तुज दार सदैव आम्हासाठी उघड रहावो
तुला डोळ्यात सामावून तुज्या
भक्तीत सदैव तल्लीन व्हाव
इतकाच मान पुरेसा वाटतो...
श्री.सी.एस.कदम
देवा बर झाल तु कोणत्याही वाहिनीवर दिसलास नाही.

189 

Share


श्री.सी.एस.कदम
Written by
श्री.सी.एस.कदम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad