Bluepad | Bluepad
Bluepad
त्रासविरहित मासिक पाळी
mohini gavas
mohini gavas
23rd Jun, 2022

Share

जमाना बदलतोय, मग आपण स्त्रियांनी का मागे राहावं.... फार पूर्वीपासूनचं स्त्रियांच्या मासिक धर्माबद्दल, अनेक अफ़वा आहेत,, आता च्या घडीला थोड्या प्रमाणात त्या कमी होत आहेत....
वयात येणाऱ्या मुलींसाठी, शाळेमध्ये गवर्नमेंट कडून, लेक्चर असायचे.. त्यावेळी प्रत्येक वयात येणाऱ्या मुलीला, मासिक धर्म का येतो, काळजी कशी घ्यावी आणि त्यानंतर शरीरात काय बदल होतात याबद्दल सगळी माहिती असायची त्या पुस्तकात....
आणि त्याच सोबत sanitary pad ही दिल जायचं.... त्यावेळी sanitary pad बद्दल खूप गैरसमज होते,, कोणी म्हणायचं गर्भपिशवीला सूज येते, तर कोण म्हणायचं,, कॉटन कापड च बर या दिवसात.... बऱ्याच किशोरवयीन मुलींनी, त्यातल्या त्यात, ग्रामीण भागातील मुलींनी, कैक वर्ष कापड वापरलय, खरं तर कापडाच्या त्या घड्या, ज्यावेळी हेवी ब्लडींग व्हायचं, आणि जेव्हा चालत जावं लागायचं, तेव्हा त्या कापडाचे काट, अक्षरशः लागायचे, साईड ला कधी कधी जखम ही व्हायची,,बर त्या कापडामुळे ओलावा जाणवायचा तो वेगळाच, शिवाय पावसाळ्यात वाळायचे ही नाही असे कपडे... प्रचंड त्रास व्हायचा त्या वेळी...
पण हळू हळू,, मासिक पाळीमध्ये कापड वापरण्याचे, दुष्परिणाम जाणवू लागले म्हणून शेवटी, ते कापड नकोस वाटायचं.. आणि त्यामुळे च सॅनिटरी pads वापरू लागलो आम्ही स्त्रिया,,
सॅनिटरी pads वापरताना, तस योग्य वाटायचं... पहिले काही दिवस, pads जास्त लागतात,, TV news मध्ये सॅनिटरी pads च्या अनेक add पाहायला मिळतात आज च्या घडीला,, आणि अशा adds मध्ये विविध क्षेत्रातील महिला वर्ग दाखवला जातो...
42rs ला एक सॅनेटरी pad, त्या मध्ये 7pads असतात,, पहिले 2दिवस दिवसाला 2pad म्हणजेच 2दिवसाचे 4pads, आणि उरलेले 3दिवस बाकी उरलेले 3pad,, 12 मंथ चे या प्रमाने 504Rs...प्रत्येक महिलांची स्तिथी थोड्या फार फरकाने वेगळी असते मासिक पाळी मध्ये....
प्रश्न पैशाचा नाही च आहे मुळात,, आरोग्यासाठी इतकं करणं गरजेचं पण, पण विचार करा, वापरलेले सॅनिटरी pads, त्याच विस्थापन होतंय का नीट,, आज ही मीं जिथे राहते,, तिथल्या रूढीप्रमाणे,, मासिक पाळीच्या दिवसात, सॅनिटरी pad खुल्यावर फेकून देण अपशकून मानलं जातं, अशा वेळी कित्येक माझ्या सारख्या महिला pads जाळून टाकतात, कोणाला न दिसावेत म्हणून..... बर सॅनिटरी pads मेडिकल मधून आणावेत तर,, असं काही पॅक करून दिल जातं जस की, काहीतरी चोरी करतोय...
हॉस्पिटल मधला, maternity hall चेक केलाय का कधी,, डस्टबिन खचाखच भरलेले असतात, त्या रक्ताने माखलेल्या pads ने,, कुठे जातो तो कचरा, आणि असा किती कचरा निर्माण होतोय याचा विचार केलाय का कधी... काही स्त्रिया खुलेआम टॉयलेट मध्ये pads टाकतात,, त्यावेळी तो टॉयलेट तुंबतो,, सफाई कामगार यांचं कौतुक वाटत, पण वाईट ही तितकंच वाटत,, कारण अशा कित्येक केस आहेत, ज्या मध्ये समाजातील अस्वछता साफ करण्यासाठी, सफाई कामगारांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय....
स्त्री मासिक धर्म,, कधीही दूषित नसतो,, दूषित असतात त्या आपल्या भावना,, आणि चालत आलेल्या चुकीच्या रूढी परंपरा,
जमाना बदलतोय,, जागृत होतोय, पूर्वी कापड वापरलं जायचं,, काही ग्रामीण भागात अजून ही कापड च वापरतात, त्यानंतर सॅनिटरी pads,त्यानंतर टेम्प्यून्स, आणि आता अलीकडच्या काळात, #Menstrual_cup आलेत... सॅनिटरी pads ना वैतागून, रादर त्याच विघटन कस कराव हा प्रश्न च पडतो?? कदाचित त्यामुळेच आज बऱ्याच महिला, menstrual cup वापरतात, आणि या मध्ये काहीही गैर नाहीय, गेले 3मंथ मीं स्वतः हा कप use करतेय... आणि खरच खूप हॅपी फील करतेय, कारण पिरियड्स आहेत हेच जाणवत नाही, या Manstrual cup मुळे
पिरियड्स चा काहीही त्रास जाणवत नाही...
Menstrual cup, बद्दल अनेक गैरसमज आहेत, भीती ही आहे, सुरवातीला माझ्या ही मनात भीती होती, याच्या वापराने हायमेन तर ब्रेक होणार नाही न, किंवा, ब्लड बाहेर येणार नाही ना,असे अनेक प्रश्न मनात होते, पण 2मन्थ सर्च केल या वर, अनेक लोकांचे Review पहिले, youtube वर search केल, फेसबुक वर महिलांच्या ग्रुप वर विचारलं, काही मैत्रिणींशी बोलले,, सगळीकडून positive views च मिळाले...
Manstrual cup इजिली मिळतात, अमेझॉन, फिल्पकार्ट, मिन्ट्रा, स्नॅपडील वर, actually manstrual cup गिफ्ट च केल आहे एका व्यक्तीने,, कारण खरच pads ने अक्षरशः वैतागले होते, प्रवासात असताना पहिल्या हेवी दिवसात pads नसतात comfortable.
Menstrual cup, madhe 3size असतात, small, medium, large.. अर्थात small size unmarried girls साठी, medium size married women साठी, आणि Large cup after pregnancy नंतर, अशा प्रकारचे manstrual cup easy way amezon, flip cart, अजून बऱ्याचशा ऑनलाईन साईड वर सहज मिळेल...
सिलिकोन धातू यापासून हा कप बनवला आहे.. त्यामुळे अगदी फ्लेक्सीबल असतो हा कप, 200rs ते 1000/1200 rs पर्यत सहज मिळतो हा कप...8/10 year सहज वापरता येतो हा कप....रेटिंगस्टार& review पाहून खरेदी केला हा कप... आज 4month होतील, या कप मुळे कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही, उलट आनंदी च आहे, की आधी का नाही वापरला हा manstrual cup... Pads मुळे इतकी वर्ष जो त्रास सहन करतेय तो वाचला असता...प्रवासात सहज कुठे ही नेता येतो...
Youtube वर या बद्दल चे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहता येतील.... पिरिड्स च कसलं टेन्शन च नाही जाणवत, या menustral cup मुळे,, आणि काही वर्षानी, may be याचाच वापर करतील सर्व महिला... कारण 100% सांगू शकते याचा कोणताही दुष्परिणाम नाहीय,, फक्त काही गोष्टीची काळजी घ्यावी
जस की, पहिले काही दिवस मासिक पाळी मध्ये जास्त ब्लड जातं,, त्यामुळे दिवसातून 2/3 वेळा कप मध्ये जे ब्लड असत ते फ्लश कराव आणि, दिवसातून 1/किंवा 2वेळा कप गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावा... कप वॉश करण्यासाठी natural liquid hi मिळत,ते ही वापरू शकता तुम्ही...
या संदर्भात, गुगल आणि youtube वर सविस्तर माहिती मिळेल... कप कोणता खरेदी करावा, कसा वापरावा, आणि मीं सांगतेय म्हणून नाही तर,, तुम्ही तुमच्या dr सोबत, ही बोलू शकता...
मीं माझ्या comfort zone साठी menstrual cup गेली 4month वापरत आहे, याचा मला कसलाच त्रास नाही झाला.. आणि इथूनपुढे ही menstrual cup च वापरेन,,तर मग तुम्ही कधी सुरवात करताय...😊
©MG©
त्रासविरहित मासिक पाळी
त्रासविरहित मासिक पाळी

237 

Share


mohini gavas
Written by
mohini gavas

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad