Bluepad | Bluepad
Bluepad
आई
सोनाली कोसे
सोनाली कोसे
23rd Jun, 2022

Share

सर्वप्रथम जिच्या आशीर्वादाने आपण घडतो ती म्हणजे आई. मायेचा सागर जिथे वास करतो ते म्हणजे आईकडे. चांगले काय नी वाईट काय हे आपल्याला अगदी सहजपणे समजावून देते ती म्हणजे आईच. तिने कितीही कष्ट उपसले तरी लेकरांना बघून डोंगराएवढेही दुःख का असेना ती अगदी हसतमुखाने सहन करते. ती स्वतःची हौस बाजूला ठेवून , स्वतः फाटकं लावून सर्वप्रथम आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करते. आई म्हणजे प्रथम गुरू. आपल्याला चालण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभं होई पर्यंत जी सद्गुण संस्कार घडवते ती म्हणजे आई.
आई ही प्रत्येकाच्या आयुष्यात वरदान आहे. स्वतःची नाही तर अगोदर डोळ्यात तेल घालून लेकरांच्या प्रकृतीची काळजी घेते. तळहाताच्या फोडाप्रमाणे ती त्यांना जपते. दुसऱ्यांचे दुःख सहजपणे समजुन आपले दुःख ती बाजूला सारते. उन्हातान्हात घाम गाळून , एक एक पैसा जोडून आपल्या मुलांना ती शाळेत घालते. त्यांच्यावर योग्य असे मार्गदर्शन करते. आपल्या मुलांना कसलीही कमी होता कामा नये ह्यासाठी ती अपार तडजोड करून मेहनत करते.
स्वतः तप्त उन्हाचे चटके सहन करत , मुलांना मात्र मायेची सावली देते. तिच्या कुशीत अवघे विश्व सामावले आहे. आई ममत्व शिदोरी. मुलाकडून चूक झाल्यास ती थोडी फार रागावते , वेळेप्रसंगी कठोरही बनते , पण त्या रागामागे तिचे वात्सल्याचे सागर दडलेले असते. आईविना जीवनाला अर्थच उरत नसतो. आई ही अशी थोर व्यक्ती आहे जी आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणून उभी राहते. जीवनाच्या वाटेवर एक आधार आहे आणि तिच्यामुळेच आपल्या जीवनाला आकार मिळतो .
किती सांगावे उपकार आईचे. ती जितकं करते ते स्वतःसाठी नसून आपल्या चिल्लापिल्लांसाठी करते. एक दिवस जरी मुलगा उपाशी राहिला तर तिच्या घशातुन अन्नाचा एक कण सुध्दा उतरत नसतो. एवढी तिची माया निःस्वार्थी असते. खरचं आई एवढे श्रेष्ठ कुणीच नसते.
कु. सोनाली कोसे , डोंगरगाव

169 

Share


सोनाली कोसे
Written by
सोनाली कोसे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad