Bluepad | Bluepad
Bluepad
🌺🌺 नात्यांचा प्राजक्त 🌺🌺
Sachin Deulkar
Sachin Deulkar
23rd Jun, 2022

Share

दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा .. माध्यम कोणतेही असो doesn't matter..संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो.. आपण नाकारले तरी fact ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो,आपल्याही नकळत.
आम्ही खूप घरे बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते..रात्री त्याची फुले ओघळायला सुरवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यन्त तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे..दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळे अभ्यास करणे शक्य नव्हते.. रात्री मी अभ्यासला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा, त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे.. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे देवातंल्या कृष्णाला वाहायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या..मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे.त्याला किती कळत होते नाही माहीत पण तो आपल्या फांद्या हलवून,कधी पाने नाचवून तर कधी सतत फुले ओघळवून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमले तर त्या दिवशी त्याचा फुलांचा सडा कमी दिसायचा.. माझे डोळे भरून यायचे..शेवटी आम्ही भाडेकरू होतो..कधी न कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावे लागणार होते..तेव्हा काय होईल त्याचे आणि माझेही? असा मला प्रश्न पडायचा. मलाही त्याची , त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. ....
काही दिवसानी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले त्यानंतरचे दोन दिवस तो ही मलूल वाटत होता..ना त्याने मला पाहून फूले बरसवली..ना पानाची सळसळ केली .. काही दिवसानी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला.. मला तर त्याच्याकडे बघवेना.. तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले, त्याच्या खोडाला मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडून घेतलं.. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता..मी त्यातली काही फूल ओंजळीत घेतली. हलका त्यांचा वास घेऊन माझ्या रुमालात ठेवली..आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले..
काही दिवसानी कळले..तो प्राजक्त आहे.. पण ती खिडकी जवळची फांदी मात्र सुकून गेली..
आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत रहा.. माहिती नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल..

176 

Share


Sachin Deulkar
Written by
Sachin Deulkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad