Bluepad | Bluepad
Bluepad
स्त्रीशक्ती
सौ.राधा दिक्षित .
सौ.राधा दिक्षित .
23rd Jun, 2022

Share

स्त्री ....मुळात स्त्री असणं काही पाप नाहीये,पण आपण आपलं अस्तित्व कशा प्रकारे टिकवून ठेवतो हे जास्त महत्त्वाचं असतं ....मुळात अबला पुरुषांवर अवलंबून असणारी अशीच ओळख आधीपासून आहे त्यामुळं त्याच व्याख्येत अडकायचं का त्याच्या परिसीमा ओलांडून स्वःतला सिद्ध करायचं हे आपल्या हातात असतं....
आत्ताच्या काळात ठिकय कि मुली स्वावलंबी बनतायत सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत...पण त्यांच काय कि ज्यांचं कमी वयात झालयं,शिक्षण नाहीये आत्ताच्या अधुनिक सोयी सुविधा त्यांना माहीतच नाहीत...आज त्या जर एकट्या बाहेर पडल्या काही कामासाठी तर...???हेअसेच काहीसे प्रश्न चिन्ह त्यांच्या समोर उभे राहतात....
मुळात आत्ताच्या मुलींनी त्यांना सगळं शिकवलं पाहिजे ...कारणा एक स्त्री च एका स्त्री च मन ओळखू शकते.पुरुषांना कधीच एक स्त्री आपल्या वरचढ झालेली किंवा आपल्या पुढे गेलेली कधीच आवडत नाही...सगळेच पुरुष असे असतात असंही नाही पण असं असतचं...
मग त्यांना आयुष्यभर पुरुषांवर अवलंबून रहावं लागतं...जर त्यांना सगळच जर पुरुषांनी मग ते नवरे असोत वा मुलं सगळं घरबसल्या दिलं चार भिँतीच्या आतच ठेवलं तर त्यंना या बाहेरच्या जगाचा परिचय कसा होणार??? आणि तो जर नाही झाला तर त्या सक्षम कशा होतील???त्यामुळे जितका त्यांना विकसित करण्याला त्यांना शिकवायला स्त्रीयांचा हातभार लागणार तेवढच सहकार्य पुरुषांनाही द्यावे लागेल....
आणि जर त्या सगळं शिकल्या तर पुरुषांचं निम्म्याच्या वर बाहेरच काम त्या करु शकतील तेवढाच पुरुषांच काम कमी होईल.. त्यांचीही चिडचिड होते कामामुळे पुरुषांना मन मोकळ करण्याची जागा नसते....आणि मग त्याचा उद्रेक पहिली म्हणजे बायको,नसेल तर आई,बहिण सहन करतात ..पणा हा ते समजून कोणी घेत नाही हे जितक खरय तितकच आपल्याच घरातल्या स्त्री ची वाहवा झालेली त्यांना सहनही होत नाही कारण त्यांचा पुरुषी अहंकार जागा होतो. अगोदर सांगितल्या प्रमाणे सगळेच तसे नसतातही पण कटू असलं तरी सत्य आहे..कर्ता पुरुष आहे आपल्याला काय करायचे या भ्रमात तर राहूच नका...आज ते करतात म्हणून ठीकय उद्या ते कर्तेच नसतील तर....???ही कल्पना किती भयानक आहे...आणि उद्याचा काय भरवसा कि काळ तुम्हाला काय वेळ दाखवेल!! पण खरं सांगू का स्त्री काय आणि पुरुष काय कुणीच कुणावर अवलंबून राहू नका...
आजच्या युगात युगात शिकाल तर टिकाल...आजकाल कुणाचाही भरवसा करता येत नाही...एकटे राहण्याची आपल्या पिल्लांना सांभाळण्याची तयारी ठेवा....तरच तुम्ही पुढची आयुष्याची वाटचाल करु शकता...आज आपण खंबीर आपण आपल्या मुलांना शिकवून डाॕक्टर,इंजिनियर,पायलट, कलेक्टर बनवू शकतो......त्यामुळे स्त्रियांना शिकवा आणि आपण स्वावलंबी बना.....
सौ.राधा दिक्षित ...
स्त्रीशक्ती

240 

Share


सौ.राधा दिक्षित .
Written by
सौ.राधा दिक्षित .

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad