रागाच्या क्षणी थोड थांबाव माणसान
मनाला आवर आपल्या घालावी माणसान
तुटणार नाही जवळचे नाते आपुलकीचे
हृदयात शांतता,माणसूकी ठेवावी माणसान
वाचतील नंतर पश्चातापाचे हजारो क्षण
वर्तमाणाला नेहमीच जपाव माणसान
क्रोधला, द्वेशाला बाजूला साराव माणसान
अनमोल ठेवा मैञिचा न तोडावा माणसान
जन्मं अन मुत्यू मध्ये काहिच अंतर नाही
जितक भेटता येईल तितक भेटाव माणसान
क्षणभंगूर या जीवनात शेवटी काय घेवून जाणार
अखेर श्वासा प्रयंत प्रेम द्याव ,घ्याव माणसान