Bluepad | Bluepad
Bluepad
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काही करत आहे का?
Rohidas gade
Rohidas gade
23rd Jun, 2022

Share

शेतकऱ्यांची आत्महत्या आणि सरकार ह्या दोन्ही विरोधी बाजू आहेत अस मला वाटतं.कारण या महाराष्ट्रात कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि करतही आहेत .त्यासाठी म्हणून ठोस अस पाऊल आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने घेतलेलं नाही ....का घेतल नाही हा ही मोठा प्रश्न आहे....शिवकाळातील छत्रपती शिवाजी राजांचही सरकार होत .त्यांच्या काळात ते ही शेतकऱ्यांना कर्ज देत होते ,त्याची वासुलीही करत होते . सरकारातून त्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य ही दिले जात होते.
पण त्या कर्जाची वसुली करताना राजे प्रथम त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न ,खर्च बघायचे आणि मगच वसुली किती करायची हे ठरवायचे आणि तेव्हढी वसुली करायचे .एखादे वर्षी जर दुष्काळ पडला तर त्या शेतकऱ्याचे कर्ज राजे माफ करायचे ....वरून त्यांना काही लागल तर ते ही द्यायचे ...त्यावेळच्या लोकांना ,शेतकऱ्यांना हा विश्वास होता की आपण जे कर्ज घेतल ,ज्यांच्याकडून घेतल ती व्यक्ती आपली आहे ....ती आपल्याला मरू देणार नाही हा विश्वास त्यांच्यामध्ये होता....आता एवढे शि,दोनशे असुनही शेतकरी मरतोच आहे
बर सरकार मदत करत ...केव्हा ....जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या घरच्यांना एक लाखाची मदत .....मेल्यानंतर सरकार मदत करत ....एक लाख रु.मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते .....किती मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्राची....छत्रपतींना मानणार हे राज्य मग ह्याच राज्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का?...मेल्यानंतर मदत करण्यापेक्षा जिवंतपणी पाच ,पन्नास हजार द्या न शेतकऱ्याला जिवंत राहण्यासाठी ....
बी, बियान, खते,औषध द्या न सरकरातून. काय बिघडते.दुष्काळ पडला .द्यावं शेतकऱ्याला त्याचा खर्च वापस ....पुन्हा नव्यानं त्याच शेतीत लावेल ना तो ....कर्जबाजारी होतो तो ह्याचमुळे...त्याला दरवर्षी शेतीत खर्च करावाच लागतो .पेरणी , औतकाठी,नांगरणी,लागवड ,फवारणी ह्या सर्व गोष्टी त्याला कराव्याच लागतात ..खर्च करावाच लागतो ....कुठे मिळतो तो वापस ... येतंय पीक तेवढं.
सोसायटी देत कर्ज .एक वर्ष बिनव्याजी...अरे पण एका वर्षात त्याला त्याने गुंतवलेले शेतीमधील पैसे ही वापस येत नाहीत कधी , कधी..कसं फेडणार कर्ज. बियाण, खत, औषध हे सर्व शेतकऱ्यांच्या माथी मारून पैसा कमावून बसतात.शेतकऱ्यानं काय करावं...भारत हा कृषिप्रधान देश म्हणतात.... खरंच आहे का हो.इथून पुढची ओळख मात्र वेगळी होईल कदाचित भारताची ...भारत हा ...आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी प्रधान देश अशी होईल .आणि ही वेळ भारतातील सरकारचं अणेल यात मात्र शंका नाही .खूप समस्या आहेत शेतकऱ्यांच्या ...पण सरकार विचार करेल तर सोडवेल ना...सरकार शेतकऱ्यासाठी , त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काहीही करत नाही आणि करेल अशी शाश्वती ही नाही
✍️✍️✍️ रोहिदास गाडे....

177 

Share


Rohidas gade
Written by
Rohidas gade

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad