आपल्या कडे आजही एका घटस्फोट झालेल्या महिलेकडे वेगळ्या नजरेने पहिल्या जाते . लग्न लाऊन देयची जबाबदारी आई वडिलांची असते ते त्यांच्या कडून होईल तेवढं छान मुलगा, कुटुंब आपल्या मुलीसाठी शोधतात व आनंदाने विवाह सोहळा पार पाडतात पण काही करना स्तव मुलीचा घटस्फोट होतो.या पेक्षा जास्त दुरद्यवी बाब एका मुलाच्या व मुलीच्या आई वडिलांसाठी नसेल. कधी निरखून पाहिलय त्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा फार वेगळा असतो. घटस्फोटाच् कारण काही असो पण मुलीची च चूक असेल अस सगळे ठरून मोकळे होतात. अन् ह्याच कारणास्तव मुलीच्या आई बाबा ला मान खाली घालावी लागते . पण का अरे ती मुलगी पळून गेलीय का की काही गुन्हा तिने केला .आई बाबा च्या पासंतीने लग्न केलं पण नाही जमल काही अडचण असेल त्रास असेल तिला म्हणून एवढं मोठा पाऊल उचलला असेल .