Bluepad | Bluepad
Bluepad
आजकाल मुले हिंसक होत आहेत.
प्रीती लांडगे.
प्रीती लांडगे.
23rd Jun, 2022

Share

आजकाल मुले हिंसक होताना दिसत आहेत. ति पटकन चिडतात,टोकाचा राग कोणी काही बोलले तर स्वतःचे काही तरी बरेवाईट करून घेणे, नाही तर आईला वडिलांना मारणे एखादे भांडण झाले तर ते तिथल्या तिथे सोडून न देता मनात खुन्नस ठेवून नंतर पुन्हा त्या व्यक्तीला मारणे किंवा कधी कधी आई वडिलांंचा खून करणे. हे सगळे काय आहे कुठे चालली आहे ही पिढी. ना याच्याकडे संयम दिसत आहे ना धिर नेमके यांना काय हवे हे सुद्धा कळत नाही नुसती भरकटत आहेत. ऐवढा राग,द्वेष की आईला वडिलांना मारत आहेत. खून करत आहेत.
आता काही दिवसांपूर्वी बातमी वाचली की, शाळेत दोन मित्राची भांडणे झाली म्हणून दुसऱ्याने सुरा खुपसून त्याचा खुन केला ही बातमी थक्क करणारी आहे. का ही मुले ऐवढी हिंसक होत आहेत. याचा विचार केला तर काही लक्षणे अशी दिसून येतात की मोबाईलचा अती वापर, आई वडिलांना वेळ नसेल तर ते मोबाईल हातात देऊन टाकतात. मग ती मुले आणि मोबाईल अस त्याचे जग होऊन जाते. दिवसभर त्या मोबाईल वर गेम खेळत रहातात. मैदानी खेळ यांना माहीत नाही. गेम खेळताना त्यात एक गोष्ट असते की समोरच्याला मारल्या शिवाय तुम्ही गेम जिंकू शकत नाही. म्हणजे मुलांच्या पेशीला आणि मेंदूला काय संदेश गेला की जिंकण्यासाठी समोरच्याला मारावे लागते. हा संदेश त्या मुलांच्या मेंदूने ग्रहण केला. आणि सतत मला चांगलेच म्हटले पाहिजे. वाईट ऐकण्याची सवयच नाही. तर आधी हे सगळे थांबवले पाहिजे.
तसेच भरीस भर म्हणून पॉर्नची सहज उपलब्धता झाली आहे या इंटरनेटच्या युगात 11/19 या वयोगटातील मुलांना हे सहज उपलब्ध आहे आणि हेच वय आहे ज्यात त्यांना योग्य वेळी योग्य गोष्टीच वळण लागण्यासाठी. परंतु याच वयात ती चुकीच्या मार्गाने जात आहे. या मुलाची संगत बरोबर नाही. याच्यावर टि.व्ही. मोबाईल, सिनेमे याचा अती प्रभाव पडत आहे. "साला हम कभी झुकेगा नहीं" या वाक्याने तर मुले जास्तच बाहेर तरली आहेत. करण खर्या आयुष्यात तुम्हाला नम्रतेने किंवा काही वेळा वाकावे सुध्दा लागते. तेव्हा हा प्रवास तुमचा सोयीस्कर होतो. मोबाईलचे एक बटण दाबले की यांना सगळे उपलब्ध होते. आणि हे गेम्स, पॉर्न जर सहज उपलब्ध होत असतील तर ते अगदी एकाग्र होऊन बघतात आणि हे सर्व त्याच्या मेंदूवर परिणाम करत आहेत. त्याचा मेंदू पोखरून टाकत आहेत. यातून ते असंयमी होत आहेत. वासनेच्या भोवर्यात अडकत आहेत. नको ते व्यसन लागत आहे. व्यसन जरुर असावे परंतु कोणत्या गोष्टींचे असावे किंवा करावे. हे महत्त्वाचे आहे. मुलांना बोलते करा यांंत्रीक जगातून थोडावेळ तरी बाहेर निसर्गात घेऊन जा. हे सगळे झाले आताच्या काळानुसार परंतु जर बारीक विचार केला निरीक्षण केले तर याला कर्माचा ही बराच प्रभाव आहे. कर्माचा सिध्दांत या अनुषंगाने विचार करून बघूया.
कर्माची गती अती गहण आहे. आपले मानवी जीवन हे गुंतागुंतीचे आणि अपेक्षेने भरलेले आहे. तुमच्या प्रत्येक कर्माचा लिखापडी त्या विधात्याकडे आहे. तुम्ही माना अथवा न माना कारण निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही जे द्याल ते परत येतेच येते मग ते चांगले असो वा वाईट. तुमचा स्पर्श, तुमचे शब्द, वागणे, बोलणे,हसणे, प्रेम करणे,भांडण करणे, मारणे, मार खाणे,खुन करणे, जेवण, ही सगळी तुमची कर्माची गणिते आहे. आता हे तुम्ही आता करा किंवा आधीच्या जन्मात करा ते परत येतेच. हे निसर्गाच्या चक्राचा फेरा आहे. साध उदाहरण देते.
"तुम्हाला भुक लागली म्हणून तुम्ही आईला जेवण मागीतले आईने ते दिले परंतु त्या आधी तुम्ही काय देले तुम्ही भुक लागलेल्या भावनेने आवाज दिला म्हणजेच जेवणाची भावना निसर्गापर्यंत पोहचली आणि जेवण तुम्हाला मिळाले. हो जेवण आईने केले तेव्हा तुम्हाला ते मिळाले. परंतु यात खूप मोठा कर्माचा सहभाग झाला एक कर्माचा सिध्दांत ती घडला आणि तुम्हाला जेवण मिळाले"
तसेच आता ही मुले हिंसक बनतात त्यात ही या कर्माचा सिध्दांत कसा काम करतो. प्रारब्ध कसे समोर उभे ठाकते ते कळते. आणि जिकडे तिकडे कलीचा प्रभाव बघायला मिळत आहे. आणि हा प्रभाव या तरुण पिढीवर हवी होत आहे. आणि त्यांच्यावर हा परिणाम होत आहे. हे कुठे ना कुठे आपल्या प्रारब्धातील धडे समोर उभे राहतात. अस काय होत असेल की,ती मुले आई वडिलांना मारून टाकतात. कर्म असे सांगते की तुम्ही जर कोणत्या जन्मात कोणाला मारले. खुन केला असेल तर तो ते कर्म पूर्ण करण्यासाठी तुमच्याच घरात किंवा तुमचा मित्र म्हणून जन्म घेतो आणि त्याचा हिशोब करून तो मोकळा होता.
असो ही कर्माची गणित काहीना पटतील किंवा काहीना पटणार ही नाहीत. ज्याला पटले त्याचा ही विचार योग्य ज्याला नाही पटणार त्याचाही मुद्दा योग्य अस ही कर्माचे गणित आहे.
यात महत्त्वाचा मुद्दा असा की,मुलांना या सगळ्यातून वाचवणे सोडवणे हे महत्त्वाचे म्हणून तुम्ही गुरूकुल पध्दतीच्या शिक्षणाची कास धरली पाहिजे. असे का तर कॉलेज मध्येच जास्त व्यसन यांना लागत आहे. गुन्हेगारी वाढताना दिसत आहे आणि यात 15 ते 21 या वयातील मुलांना टार्गेट केले जात आहे. आणि हे त्यांना कळत ही नाही,त्यात त्याचे वय अलड असते.
येथे शाळा,कॉलेज च्या विरोधात बोलले जात नाही. तर त्यात शिकवणारे शिक्षक आणि शिक्षण ग्रहण करणारे विद्यार्थी हे कुठे तरी कमी पडत आहे. आपल्या गुरुनी ऋषीमुनींनी जे काही ज्ञान निर्माण करून ठेवले आहे ते वाढायला हवे होते,परंतु तसे होताना दिसत नाही र्हास होताना दिसत आहे. आताच्या पिढी समोर एक ही अस आदर्श उदाहरण नाही. आधी निदान आदर्श बघायला वाचायला मिळत तरी होते. परंतु आता बोटावर मोजण्या ऐवढे पण नाही. असे आदर्श निर्माण करायचे असतील तर ते या पिढीतूनच निर्माण होणार आहेत. म्हणून यांना गुरूकुल पध्दतीची खूप गरज आहे. आणि यांची तुम्ही आम्हीच निर्मिती करू शकतो. आई वडिलांनी आधी गुरूकुल पध्दतीची कास धरली तर त्याच्या मुलांना या पध्दतीची आवड निर्माण होईल. या मुलांना जास्तीत जास्त मैदानी खेळ, स्वतःचे निरक्षण करायला शिकवणे. तसेच आत्मविश्वास,धैर्य,जिद्द, धाडसी वृत्ती, एकमेकांना समजून घेणे,मदत करणे हे शिक्षण द्यायला हवे. आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यायला हवी. कृष्ण निती,राम,एकलव्य,अर्जुन, याचे धडे द्यायला हवे तर मला कुठे माझ्या भारताचे उज्ज्वल भविष्य बघायला मिळेल. म्हणून या पिढीला हिंसक होण्या पासून वाचवण्यासाठी या शिक्षणाची गरज आहे. बघा विचार करा. तुमचे भविष्य तुमच्या हतात आहे. ज्याला हे पटले उत्तम ज्याला नाही पटले तरी हरकत नाही. कारण प्रत्येकांचा दृष्टिकोन वेगळा परंतु बारकाईने विचार केला तर नक्की लक्षात येईल.
प्रीती लांडगे.

182 

Share


प्रीती लांडगे.
Written by
प्रीती लांडगे.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad