समजावली असतीच जरा चूक माझी. उभे आयुष्य तुझ्या शिक्षेस पात्र होते बाहेर आसवांना कोसळून पूर येतो आत काळजात तुटलेल्या नात्यास त्रास होते ना मागितला स्पर्श कधी ना छंद तुझ्यात वावरण्याचा फक्त हृदयात तुझ्या मला थोडी जागा फार होते एवढाच एक छंद मी आज वर तुझ्यासाठी जोपासला हृदयात तुझ्या आठवणीत मी कोरिले तुझे नाव होते घे माझ्या आसवांना कधी तू ओंजळीत आपल्या तुझ्या आठवणीत अर्पिलेले ते माझे श्वास होते समजावली असतेस मला किंवा मला समजली असती थोडी उमगली ना चूक कुणाची आता वाढते अंतर फार होते ना राग तुजवरी माझा कुठलाच फक्त एक खंत माझी नाते तोडण्याचा केला निश्चय तर का सोडले प्राण होते सर्वस्व हारलो मी आता स्तब्ध देह झाला .माझ्यात उरले ते आता फक्त काही श्वास होते माझ्यात उरले आता फ्रॉम....... प्रशांत उज्वल कर