Bluepad | Bluepad
Bluepad
पुर देशासाठी मारकच .
Bandu (Ghanshyam ) L.  Sangidwar
Bandu (Ghanshyam ) L. Sangidwar
23rd Jun, 2022

Share

पावसाळा सुरू झाला की बरंच काही सांगून जाते. जिवनात जे काही प्राप्त होते .ते पावसाच्या पाण्यामुळेच असं म्हटलं तरी चालेल.ज्या प्रमाणे जिवन जगण्यासाठी अन्न वस्न निवारा आवश्यक आहे त्याचप्रमाणे हवा पाणी सुध्दा आवश्यक आहे . पाणी हे अमृत आहे. पाणी नाही तर जिवन नाही .जिथे पाणी तिथे स्वर्ग आहे असे म्हणतात. आणि पाणीच नाही ते वाळवंट. निसर्ग पर्यावरण शेती विज सृष्टीत जे दिसते आपण बघतो. जिवसृष्टी वन्यजीव प्राणी मानव विविध शोध विकास वैभव धन संपत्ती सारं काही पाण्यामुळेच. थोडं भिन्न विचार केला की जर पाणी च नसतं तर याच उत्तर आहे ही सृष्टी च नसती. जसं पाणी हे जिवनाचा आनंद आहे. सुख समाधान आहे. पाणी जिवन दान देतोय तसंच.पाणी आनंद हिरावून घेऊ शकतो. पाऊस अधिक झालं तर सर्वत्र पाणी च पाणी. आणि आकाश फाटलं तर पुरच पुर महापुर मग होत्याच नव्हतं होऊन जाते. जसं प्राप्तीचा आनंद आहे .तसं त्यागाच मुल्यांकन होत नाही. ज्या प्रमाणे आपण एखादी वस्तू खरेदी करीता मार्केट मध्ये जातो. त्याची योग्य किंमत दिल्याशिवाय आपल्याला ती वस्तू प्राप्त करता येत नाही. त्याचप्रमाणे जिवनात जे काही प्राप्त करायचे असेल तर याची किंमत द्यावीच लागेल. पुरामुळे वित्तहानी दुष्काळ निसर्ग हानी जिवहानी पशू पक्षी प्राणी विविध रुपात काही ना काही. आपल्याला द्याव लागतं. जिवनात वैभव विकास आनंद. सुख समाधान पाहिजे असेल तर त्यागाची भुमिका दृष्टीकोन स्विकारल्यशिवाय पर्याय नाही. त्यागाशिवाय लक्ष इच्छित साध्य प्राप्त करता येत नाही. आपल्या जिवनतील साध्य जेवढा मोठा तेवढाच त्यागाचा विचार सुध्दा मोठा असला पाहिजे. अमेरीकेने जपान वर हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर बाम्ब टाकून जपान च होत्याच नव्हत झालं. जपान पुर्ण बेचिराख झाले. जेवढी हानी पुरामुळे होते. त्यापैक्षा अधिक हानी जपान देशाचं झालं होतं. जगाच्या नकाशात जपानच स्थान मिटलं आहे असंच झालं होतं. जपान त्यागाची भुमिका स्विकारत पुन्हा न घाबरता जगाला दाखवून दिले .आज पुन्हा जपान अधिक प्रगत सर्वच क्षेत्रात इतर देशांच्या समोर आले. विना त्यागाने काहीच मिळत नाही. त्यासाठी सहन करण्याची हिम्मत ठेवली पाहिजे. दगडातील मुर्तीला नविन स्वरूपात दिसायला दगडाला कितितरी घाव सहन करावे लागत. साध्यापर्यत पोहचायच असेल तर रस्त्यावरील अडथळे दूर करावेत लागतं. जर पुरामुळे देशाचं नुकसान होत असेल तर त्यापेक्षा त्यागाची भुमिका स्विकारत आपण देशाच्या विकासासाठी येणारया संकटात मार्ग काढीत पुढे जात विकास करण्यासाठी प्रेरणा घेणे अधिक चांगले. विकासासाठी संतोष किंवा समाधान यांचा अर्थ प्रयत्न न करणं असं होतं नाही.परंतु प्रयत्न करून जे प्राप्त होते त्यात समाधान मानून प्रसन्न राहते असं होतं. परंतु लोक प्रयत्न न करताच समाधान मानतात. . बरेच लोक समाधानाच्या नावाखाली आपली कार्यक्षमता लपवितात.. पुर परिस्थिती नियंत्रणात आणता येते. परंतु पुराच्या पाण्याचा उपयोग व्हावा . त्यावर प्रकल्प शेती विज शेती सारे काही विकासाचे नियोजन आतापर्यंत झाले नाही. परीणामी आपल्याला नुकसान सहन करावे लागते. सफलता समाधान साध्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सफलता समाधान मिळविणे हे जिवनाचे समाधान नाही. तर आपण किती त्याग केला आहे यावरुनच जिवनाचे समाधानाचे मुल्यमापन होते. पुर सुध्दा आपल्याला सकारात्मक घेता आले पाहिजे.

234 

Share


Bandu (Ghanshyam ) L.  Sangidwar
Written by
Bandu (Ghanshyam ) L. Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad