Bluepad | Bluepad
Bluepad
कवितेत समुद्र सामवून घेताना............भाग 2 (प्रवासवर्णन)
अक्षय चरण सितापुरे
अक्षय चरण सितापुरे
23rd Jun, 2022

Share

कवितेत समुद्र सामवून घेताना............भाग 2 (प्रवासवर्णन)
माझी एकदाची तैयारी झाली .पोटभर जेवण केले आणि आईचा निरोप घेऊन मि घराबाहेर पडलो.घरातून निघायाच्या आधी वडिलांच्या फ़ोटोच्या आणि आईच्या पाया पडलो.कारण मनात एकच विचार होता की,आई आणि वडिलांच्या आशीर्वादा शिवाय कोणतेही काम करायचे नाही. कारन त्यांच्या चरणात स्वर्ग सामवले आहे.निघताना काकांचे ही आशीर्वाद घेतले.कारण वडील वारल्यानंतर मला संभाळुन घेणारे,ते एकमेव व्यक्ति होते.ज्याने मला आजुन तरी खचून दिले नव्हते.आणि कोणतेही काम करण्यास आडवले नव्हते.
मि महाराष्ट्रात अनेक समेलन केली होती, पण महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातला समेलनासाठी जाण्याचा माझां पहिलाच अनुभव होता.म्हणून मि खुप खुश होतो.त्याच आनंदात असताना मि माझी बॅग पाठिला लटकवली.आईला येतो म्हणून सांगितले आणि एकदाचा प्रवासाला निघलो.आई थोड़ी नाराज होती.तिच्या डोळ्यात पाणी देखील आले होते.तिने ते दाखवेल नाही,पण माझ्या ते लक्षात आले.निघान्याआधी मि वरद ला कॉल केला.मला स्टैंड ला सोडतो का...........?माझ्या एका शब्दावर तो तैयार झाला होता.मला घेण्यासाठी तो घरापर्यंत आला. आणि त्याला येणे भाग होते.कारण आमच्यात मैत्री जरी असली तरी मैत्री पलीकडे असणारे ज्या नात्याची तुलना आम्ही कशातच करू शकत नाही,असे आमचे नाते होते.
वरद मंदिराशेजारी येऊन थांबला.त्याच्या गाडिवर बसता बसता मि अभी ला कॉल केला....अभी हे व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या आयुष्यातले शब्दात न मांडता येणारे व्यक्तिमत्व ......अर्थात माझा मानलेला मोठा भाऊ........पण आमच्या मधे तसे काहीच नव्हतं.कारण रक्ताच्या नात्याच्या असणाऱ्या भावापेक्षा जास्त जीव तो मला लावत होता.त्याला कॉल करुण सांगितले की , मि निघतोय...........त्याला देखील माझी काळजी लागली होती.हा इतक्या लांब एकटा चालला आहे, तर व्यवस्थित जाईल का....?जाताना त्याने मला घरी बोलवले.पण मला ते शक्य नव्हते.कारण कोणत्याही परिस्थित मला 12 वाजेपर्यंत पुणे गाठायचे होते. त्याच्याशी फोन वर बोलने सुरु असताना त्याने देखील मला समजावून सांगितले की ........व्यवस्थित जा...,काळजी घे स्वतःची....., वगेरे वगैरे..... त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर by बोलून कॉल कट केला.वरद गाड़ी चालवत होता.आणि तो ही कॉल कट झाल्यावर बोलायला लागला.अक्षय व्यवस्थित जा,काळजी घे, पोहोचला की कॉल कर...........प्रत्येक जण माझ्यासाठी किती काळजी करत आहे,हे पाहुन मला जरा बरे वाटले....वरद ने मला स्टैंड ला सोडले आणि तो बोलायला लागला मि निघतो .मला थोडी घाई आहे.त्याने माझ्या साठी भिस्किट आणले होते.ते देऊन तो निघुन गेला.त्याला माहित होते.की, मला रात्री 12 वाजता भूक लागते..आणि त्या काळजी ने त्याने मला भिस्किट पुडा दिला.खरे तर ते भिस्किट नव्हतेच ...........ते माझ्या नज़रेत आमच्या दोघांमधे असणारे प्रेम होते.वरद ला by बोलून मि माझी पाउल स्टैंड च्या दिशेने वळवली. पुण्याला जाणारी एक गाड़ी निघतच होती....तिला हात देऊन बस मधे जाऊन बसलो आणि मनाला बरे वाटले.....थोड्या वेळाने गाड़ी पुण्याच्या दिशेने निघाली, आणि माझां एकदाचा गुजरात चा प्रवास सुरु झाला........
क्रमशः........
अक्षय चरण सितापूरे
अहमदनगर
8308930957
भाग आवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा............पुढील भाग लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

183 

Share


अक्षय चरण सितापुरे
Written by
अक्षय चरण सितापुरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad