Bluepad | Bluepad
Bluepad
पूर !
K
Kishor Bavdekar
23rd Jun, 2022

Share

पूर ! पूर म्हटलं तर साहजिकच अंगावर काटेच येतात. अत्यंत भयानक घटना. सर्वच अडचण व त्रेधातीरपिट होते. अशा प्रसंगात नक्कि काय करायचे सूचतही नाही. जोरात पाण्याचा प्रवाह. प्रवाहाला थोपविण्यासाठी अंगात शक्तिसुद्धा नाही अशी परिस्थिती. पूराचे पाणी गळ्यापर्यंत पोहचल्यावर तर परिस्थीती अती गंभीर होऊन जाते. निसर्गाच्या थैमानासमोर माणूस अक्षरशः हतबल होऊन जेरीस येतो. अशी एकंदर भयानक परिस्थीती जोरदार पाऊस झाला असता मानवी जीवनांत घडते. बोलता बोलता या पूराचे महापूरांत कधी रुपांतर होते हेसुद्धा लक्षांत येत नाही.
पूर !
अशा पूर व महापूराच्या अनेक कहाण्या, घटना महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, केरळ व जम्मू काश्मीर येथे यापूर्वि रौद्रस्वरुपांत घडलेल्या आपण या देशांत पाहिलेल्या आहेत. या महापूरांच्या घटनांत मोठ्या प्रमाणांत मनुष्यहानी, पाळीव जनावरे हानी, घरांची पडझड, मोठमोठ्या वृक्षांची पडझड, विद्युत व्यवस्थेचे नुकसान व मानवी जीवनाची अतोनात प्रमाणांत झालेली अधोगती आपण नेहमीच पाहिलेली आहे. त्यामुळे या अचानक होणाऱ्या नैसर्गिक हल्ल्याविरोधात आता मानवाने चांगल्याच प्रकारे आगाऊ रित्या सतर्क असणे हे शहाणपणाचे झालेले आहे.
सद्ध्याच्या काळांत नैसर्गिक अस्मानी संकटांचा ससेमीरा मानवाचा चांगलाच पाठलाग करताना आढळून येतो. तेंव्हा आता कधी कोणत्या अस्मानी संकटांचा घाला होईल हे सांगणे सुद्धा अतीशय कठिण झालेले आहे. संपूर्ण विश्वात मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परिस्थीतींत, पर्यावरणांत व वातावरणांत प्रचंड वेगाने स्थित्यंतरे घडताना आढळून येत आहे. दिवसेंदिवस हा मानवी हस्तक्षेप केवळ मनुष्य लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने कमी होण्याऐवजी अधिकच वाढतच चाललेला आहे. ही खरोखरच मानवी जीवनास धोक्याची घंटा असून अतीशय घातक आहे. हे समस्त मानव जातीने वेळीच लक्षांत घ्यावयास हवे. अन्यथा भविष्यकाळात मानवाला निसर्गाच्या रौद्ररुपाला व भयानक संकटाला सामोरे जावेच लागेल यात शंका नाही.
आज मानव प्राणी विविध समस्यांनी अगोदरच जीवनांत त्रस्त आहे. त्यातच या अस्मानी संकटांनी जर थैमान घातले तर मानवाची या भूतलावर भविष्यांत किती गंभीर परिस्थीती निर्माण होईल याचे काहीही सांगता येणार नाही. मानवाचे अतोनात नुकसानच झालेले पहावयास मिळेल. म्हणूनच हे सर्व टाळावयाचे असल्यास आजच मानवाने या बाबींवर सांगोपांग विचार करुन त्यासाठी वेळीच योग्य पाऊले टाकणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात पच्छाताप करण्या पलिकडे हाती काही शिल्लक राहणार नाही. यासाठीच समाजांतील हुशार विचारवंतांनी यात पूढाकार घेऊन याबाबतीत सुरक्षा प्राप्त होण्यासाठी योग्य उपायांची मजबूत योजना आखून याविरोधात प्रभावी यंत्रणा प्रामाणिकपणे उभी करणे हे शहाणपणाचे ठरेल. अन्यथा भूतकाळात घडलेल्या दारुण प्रसंगांनुसार जीवनांत अश्रू ढाळत बसावे लागेल एव्हढे मात्र खरे. म्हणूनच याबाबतीत आता समाजांतील प्रत्येक व्यक्तिने स्वतःच्याच प्रेरणेने यांत काहींना काही भाग उचलून यांत कसे काय आगाऊ सुरक्षा व्यवस्था करावी लागेल याबाबत विचार करुन स्वतःचे काहींना काही योगदान अंतर्भूत करणे महत्वाचे आहे. यासाठी समाजांत मोठ्या प्रमाणांत जनजागृती होणे आवश्यक आहे.

172 

Share


K
Written by
Kishor Bavdekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad