घन ओथंबून येती, घन जेव्हा धो धो बरसातात तेव्हा सगळा निसर्ग ओलाचिंब होतो.
गरमीने त्रस्त झालेल्या जीवाला पावसाळ्यात खुप शांती समाधान मिळते. उन्हाने करपलेला निसर्ग वर्षा सरीने फुलुन जातो. आणि हा फुललेला निसर्ग बघताना मन आनंदाने भरून जाते.
पण जेव्हा वरुण राजाची कृपा अती होते, तेव्हा अतिवृष्टी होते. आणि आपल्याला पुरा सारख्या समस्येला तोंड द्यावे लागते. खुप पावसा मुळे नदी नाले भरभरून वाहत असतात. कधी कधी हा पुर इतका भयंकर असतो की पुर्ण गावच पुराच्या पाण्यात वाहून जात.
पुराच्या प्रवासाला इतका जोर असतो कि तो आपल्या सोबत गाई गुरे सुध्दा वाहुन नेऊ शकतो.
पाऊस जसा मनाला आनंद देतो , तसा तो अति झाला की रौद्र रूप धारण करतो.
पुराचा त्रास सगळ्यांना च होतो, पण जास्त त्रास ग्रामीण भागात होतो. जास्त करून मातीची घर असल्यामुळे पुरा मध्ये वाहून जायला फारसा वेळ लागत नाही.
पुरामुळे गावाचा संपर्क च तुटून जातो. एस टी ची गाडी 🚆🚆 गावात जाऊ शकत नाही. विजेची समस्या होते . जो पर्यंत सरकारी मदत मिळत नाही, तो पर्यंत सगळ्या पुर ग्रस्त लोकांना हलाखीचे जीवन यापन करावं लागतं. पुरा मध्ये अनेक लोक वाहुन गेल्या च आपण पेपर मध्ये बातमी वाचतो. पुरा चे हे भयानक रूप असते.
सगळ्या त मोठी समस्या तर पुर ओसरल्यानंतर असते.
सगळी कडे चिखल झालेला असतो. पीणयाचे पाणी दुषित असते. पुरा मुळे अन्न धान्यांचा तुटवडा निर्माण होतो. औषध उपचार डॉ ह्यांचा अभाव असतो.
पुरामुळे अश्या अनेक समस्या चा सामना करावा लागतो.
पुर येतो नंतर ओसरतोही , पण ओसरल्यानंतर पुराच्या काळया कूटृ कडु आठवणी मागे ठेऊन जातो.हे निश्चितच आहे.
कित्येक कुटूंबाची व्यक्ती गत हानी झालेली असते. ती हानी कधीच भरून येण शक्य नाही. ऊरतात नुसत्या च आठवणी.
पै पै पैसा जमवून बाधलेल घर, पुरात पुर्ण भुईसपाट झाल. डोक्यावर च छप्पर च ऊडुन गेल. आता उरल्या फक्त आठवणी.
निसर्ग सौम्य आहे तसाच तो रौद्र पण आहे .
अरुंधती धर्माधिकारी कुंडले
वाकड पुणे