Bluepad | Bluepad
Bluepad
हास्य व्यंग
suwarta
suwarta
23rd Jun, 2022

Share

या कथेत मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे .बालपणी आपण किती भोळे वेंधळे, विसरभोळे असतो. आणि आपल्या सरांचे ,बाईंचे  बोलणे ईतक मन लाऊन ऐकतो ईतके जास्त आज्ञा धारक असतो की त्या आज्ञाधारकतेचा त्याना त्रास होतो. 😀😀 आणि आपण ईतके भोळे की आपल्या ते ध्यानीमनीही  येत नसतं .
तर कथा आहे एका भित्र्या , स्वभावाने भोळ्या,वेंधळ्या,नम्र, नाजुक, ईमोशनल,जितकी भित्री ,तितकीच डेरिंगबाज म्हणजेच स्वभावात  एकाचवेळी दोन  भिन्न छटा असलेल्या मुलीची. तिला सहज  आणि लवकर समजणार्या गोष्टी लवकर  समजत नसत.पण तिच गोष्ट जर कठिण स्वरूपात सांगितली तर लवकर समजत असे😃 तर अशा या मिश्र स्वभावाच्या मुलीची ही  ईयत्ता तिसरीत असतानाची गोष्ट.लोकमान्य पुण्यतिथीनिमित्त शाळेत भाषणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.साहजीकच या मुलीला सुध्दा बाईंनी भाषण लिहून दिलेले होते. सर्व मुलींसहीत हिचेही भाषण पाठ होते.बाईंनी लोकमान्य पुण्यतिथीच्या आठ दिवस आधी सर्व मुलींचे भाषण पाठ झालेय की नाही हे पडताळण्यासाठी म्हणून सर्व मुलींना एकत्र बोलावले ज्यांनी भाषणात भाग घेतला होता.एकामागे एक ईयत्ते प्रमाणे भाषणे होऊ लागली.आता नंबर आला या मुलीचा. हिला बाईंनी टिळकांच्या बालपणीची शेंगा खाऊन टरफले वर्गात फेकण्याची गोष्ट लिहून दिली होती.आता ही मुलगी जागेवर उभी राहिली आणि आपल्या भाषणास  नेहमी प्रमाणेच सुरुवात केली. सन्माननीय व्यासपीठ आणि  माझे पूज्य गुरूजन वर्ग  येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो मी आज जे काही तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे,ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.आणि पोरीने पुढील भाषणास सुरुवात केली.बाळ गंगाधर टिळक हे नेहमी खरे बोलत.एकदा गुरुजी वर्गात नसताना मुलांनी वर्गात शेंगा खाल्या व टरफले वर्गातच टाकली.तितक्यात बाईंनी तिला थांबविले त्यांना तिचा टरफले शब्दाचा उच्चार वेगळा वाटला.पून्हा बाईंनी तिला तेच वाक्य पून्हा बोलण्यास सांगितले पण नाही बाईंना काही समाधान वाटेना.कारण ती वेंधळी टरफले शब्दाचा ऊच्चारच असा काही करे की सर्व मुली आणि बाई हसायला लागत. तो ऊच्चार ती या प्रमाणे करे .एकदा वर्गात गुरुजी नसताना मुलांनी शेंगा खाल्ल्या व ट.,.....र......फ.....ले......वर्गातच टाकली.तिचे वाक्य पूर्ण होते तोवर पूर्ण वर्ग आणि बाई हसायला लागत.आता ती लाजली ,घाबरली तिची चूक तिला कळेना. बाईंनी सांगितले भाषण नीट पाठ कर.पण ती कोठे चुकली हे काही कोणी सांगितले नाही,त्या पोरीला वाटले माझे तर  भाषण पाठ आहे .मग बाई का पून्हा भाषण पाठ करायला सांगत आहेत? भाषणात पून्हा  तीच चूक दोन तीन वेळेस  झाली बाईंना वाटले की ही मुलगी चूकून बोलतेय, टरफले शब्द. बोलताना,जो साधा सरळ शब्द होता टरफले ज्यात जोडशब्द नव्हता. तरी ही मुलगी असे का ऊच्चार करते?आता काय आयडिया करायची की हि मुलगी त्या शब्दाचा योग्य ऊच्चार करेन? चारही बाई विचार करु लागल्या..😃. आणि एका छोट्याशा भाषणासाठी मुख्याध्यापक बाईंसकट सर्व बाईंना विचार करायला लावणारी दुसरी तिसरी कोणी नसून मीच  वेडी होते😃होते . हम्म्म चला ,आयडिया सुचली मुख्याध्यापिका बाईंनी सांगितले.आणि पून्हा मला भाषण बोलायला सांगितले मी  पून्हा टरफले शब्दात अडखळली.टरफले असे सहज न बोलता ट.....र.....फ....ले असे प्रत्येक अक्षरात संथा घेऊन बोलत होती.पून्हा सर्व बाईंसोबत सर्व वर्ग माझ्यावर हसला..तिथेच लगेच बाईंनी मला थांबविले.म्हटले थांब.मी फळ्यावर आता जे लिहिते ते वाच.आता मुख्याध्यापिका बाई फळ्यावर काय लिहितात याकडे सर्वांचे लक्ष होते. बाईंनी खडू हातात घेतला व मला भाषणात जो शब्द आधी लिहून दिला होता बाईंनी तोच शब्द फळ्यावर लिहिला टरफले आणि बाई मला म्हटल्या वाच हा शब्द मी अगदी आधी सारखेच प्रत्येक अक्षरात संथा घेऊन वाचले ट.....र....फ....ले.सर्वांनी डोक्यावर हात मारले.हसावे की रडावे की या मुलीलाच चोपून काढावे असे सर्वांच्या हावभावावरून दिसत होते.  आणि टरफले शब्द सुद्धा माझ्याकडे मोठमोठे डोळे टरकावून  रागात पाहात असल्याचे मला जाणवले.😀😃 टरफले शब्दाची मी पार टरफले उडवून टाकली होती .मनात आलेला राग जेमतेम  तसाच  गिळला बाईंनी .आणि फळ्यावर पून्हा त्याच शब्दाला नविन रुप देऊन लिहिले टर्फले😃😃 आता वाच बरे मुख्याध्यापिका बाई म्हटल्या आणि  मी  लगेच तो शब्द वाचला.अगदी अक्षरात संथा न घेता😃😃😃 टर्फले...तर असे हे कठिण भाषा समजणारे धूड होते.बाईंनी भाषणात लिहिलेल्या टरफले शब्दाला खोडून ट लिहून र ला फ जोडून  त्या नंतर ले हे अक्षर लिहिले टर्फले 😃😃आणि हिला सोपी भाषा नाही कळत कठिण भाषा समजते याचा प्रत्यय सर्वांना आला.😀😀😀.तर असे हे साध्या भोळ्या वेंधळ्या वेशातील कठिण रुप.विसराळूही तितकेच होते.
वरच्या वर्गात गेल्यावर मला  विसरभोळा गोकूळ नावाचा एक धडा होता.अगदी सेम आपल्याच सारखा आहे की हा गोकूळ .जणू आपलीच कथा.पण नाव मात्र गोकूळ ठेवलेय ईतकाच काय तो फरक असा विचार मी करे. आणि पून्हा पून्हा तोच तो धडा वाचून अगदी तोंडी पाठ झाला होता माझा तो धडा.एकदा आईने मला राॅकेल आणायला बाजारात पाठवले.आईने सांगितले होते की बाजाराच्या मागच्या बाजूला राॅकेलचे दुकान आहे म्हणून मी मनातच पाठ करीत गेली. बाजाराच्या मागच्या बाजूला राॅकेलचे दुकान, बाजाराच्या मागच्या बाजूला राॅकेलचे दुकान, बाजार आला आणि बाजाराच्या मागच्या बाजूला राॅकेलचे दुकानही . चार लिटर रॉकेल घेतले  पाच रुपये लिटर प्रमाणे काकांनी मला हिशोब करायला सांगितले चार लिटर रॉकेल पाच रुपये प्रमाणे किती?वीस रुपये मी पटकन हिशोब सांगितला पण राकेलचे पैसे न देताच घरी जाण्यास निघाली.विसरली मी पैसे देण्याचे पाठ करण्यात.आता पाहायचे म्हटले तर बाजार व माझ्या घराचे अंतर खूप होते.एक किलोमिटर तरी होते. आता घर केवळ पाच दहा पावलांवर होते तितक्यात मला हाताला काही तरी टोचले,काय टोचले हाताला?असे म्हणून मी हाताची मूठ ऊघडली तर" बापरे! आता कसे होईल माझे?राकेलचे पैसे न देताच मी चार लिटर रॉकेल घेऊन आले?ते काका काय म्हणतील मला चोर? काय विचार करीत असतील? आणि आता असेच घरी गेले तर वडिलही मारतील पैसे न देता निघून आले म्हणून?आणि मला त्या विचारात दरदरून घाम फुटला.हातपाय थरथरु लागले.डोळ्यात अश्रु आले या विचिराने की ते काका मला काय म्हणत असतील ?माझ्या बद्दल काय विचार करीत असतील?तशीच मी माघारी फिरले आणि राकेलच्या दुकानात आले आणि घाबरत घाबरत राकेलवाल्या काकांना म्हणाले काका!मला माफ करा मी पैसै देण्याचे विसरले हो! रस्त्यात आठवण आली आणि पैसे द्यायला आले मला माफ करा काका.मी मुद्दाम नाही केले.आणि मी ढसाढसा रडायला लागली.काका मला ओळखत होते मी  कुणाची मुलगी आहे ते.पण मला कुठे माहीत होते की काका माझ्या वडिलांना ओळखतात? काकांनी मला सांगितले अग वेडाबाई मी ओळखतो तुझ्या वडिलांना तू नसती आलीस तरी चाललं असत मी घेतले असते तुझ्या वडिलांकडून पैसे.तर अशी ही विसराळू  मी राकेल घेऊन हसत  हसत आनंदाने घरी आली.आनंद हा की काकांनी माझ्या बदल काही गैरसमज नव्हता केला. आता खात्रीच झाली माझी की विसरभोळा गोकूळ हा दुसरा तिसरा कोणी नसून माझाच तो मागच्या जन्माचा जन्म होता.दुकान बाजाराच्या मागील बाजूस आहे हे पाठ तर केले,पण दुकानात राकेल आणण्यास गेले होते, आणि राकेल आणण्यासाठी पैसे नेले होते सोबत ते पैसे देण्याचेच विसरले होते ना मी.जसे विसरभोळा गोकूळ ऊपरण्याला गाठी  मारायचा आठवण राहावी म्हणून.पण कोणत्या आठवणीसाठी कोणती  गाठ मारली हेच विसरायचा.
आता मी पाचवीत गेले होती तेथेही गांधी जयंती निमित्त भाषण देण्याचाचा प्रसंग आला माझ्यावर.ज्या सरांनी भाषण लिहून दिले होते ते म्हटले की भाषण देतांना शांत ऊभं नाही राहायचं हलत राहायचं पण नेमकं हलण म्हणजे कसं हलणं?हे काही स्पष्टपणे नाही सांगितले.😀😀😀.कुणालाच नाही कळले वर्गात भाषण देताना नेमकं कोणत्या पध्दतीने हलायच हलत राहायच ते😆😆😆.सर्वांनी एकमेकांकडे कुतुहल मिश्रीत प्रश्नार्थक नजरेने पाहीले पण उलगडा नाही झाला.हलत राहण्याचे कोडे काही सुटले नाही कोणाला.आणि सरांना विचारायची हिंमतही कोणाची झाली नाही.आणि  मग भाषण देताना  प्रत्येक शब्दाला मी हलू लागले😃😃 . डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे 😃😃😃आणि शेवटी भाषण देतांना हलत राहण्याच्या दिव्यातून मी एकदाची बाहेर आली.  माझे भाषण संपले .पण सर्वांनीच भदाणे सरांचे बोलणे  अगदी तंतोतंत पाळले होते.असे कुणीच नव्हते की भाषण देताना जो हलला नसेल😀😀😀डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे 😃😃  नाॅनस्टाॅप ते ही 😀😀.भाषणांचा कार्यक्रम संपला होता जो तो आपापल्या घरी आले.घरी आल्याबरोबर माझा भाऊ जोरजोरात हसायला लागला.आता हे काय नविन म्हणून मी भाऊकडे पाहू लागली.भाऊ आईला सांगत होता आई बाई ना भाषण देताना नुसती हलत होती आणि ती कशी हलत होती याची नक्कल सुध्दा भाऊने करून दाखविली आईला.आता आई आणि मी सुद्धा जोरजोरात हसायला लागले.मी अशी दिसत होती भाषण देताना हलतांना?माझे मलाच  हसू आले आणि भदाणे सरांनी का हलत राहायला सांगितले असेल असे ?हा विचार करू लागले.दुसरा दिवस ऊजाडला सर्वच मोठ्या आशेने शाळेत गेलो की भदाणे सरांची शाबासकी मिळेल आपल्याला या विचारात.शाळा भरली भदाणे  सर वर्गात आले.हजेरी घेतली आणि मग एकदम रागाने सर्वांना विचारले काल तुम्हा सर्वांना काय झाले होते भाषण देतांना हलत का होते?पून्हा  सर्वांनी एकमेकांकडे त्याच प्रश्नार्थक, नजरेने पाहीले की भलाणे सरांनीच आपल्याला हलत राहायचे भाषण देताना असे सांगितले होते आणि आज तेच आपल.यावर रागावर आहेत का?या नजरेने सर्व एकमेकांकडे पाहात होते पण बोलायची हिंमत कुणाकडे नव्हती, सांगायची हिंमच कुणाकडेच नव्हती की  सर ,तुम्हीच भाषण देताना हलत राहायचे असे सांगितले होते म्हणून आम्ही हलत होतो  असे.. शेवटी एका मुलाने सांगितलेच की सर तुम्हीच सांगितले होते आम्हाला भाषण देताना हलत राहायचे.म्हणून आम्ही हलत होतो.😃😃😃 भदाणे सरांनी कपाळावर हात मारला. आता पुन्हा सर जण बुचकळ्यात पडले की भदाणे सरांनी कपाळावर हात का मारला? एकामागून एक नुसते शाॅक बसत होते आम्हाला. आता सर काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.भदाणे सर म्हणाले अरे मूर्खांनो हलत राहायचे म्हणजे हातवारे करत राहायचे असे मी तुम्हाला सांगत होतो.आता मात्र कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आमच्यावर आली..😀😀😃😃 यात चूक कोणाची होती?भदाणे सरांची आमची?की भदाणे सरांनी चूकीचा शब्द वापरला त्या शब्दाची?😆😆😆😀😀😃तुम्हीच ठरवा आणि सांगा आता.
    

166 

Share


suwarta
Written by
suwarta

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad