तो शांत, संयमी,साधा मितभाषी असा जंटलमन,
तो एका वटवृक्षाच्या छायेत वाढलेला,वडिलांचा मोठा करिश्मा, आपल्या रोखठोक भूमिकेने अख्खं राजकीय वातावरण ढवळून काढणारं वक्रुत्व आणि नेत्रुत्व,,
पण हा मात्र आपल्या आवडीच्या छंदात फोटोग्राफीत रमणारा,राजकारणात याला रसच नाही, अशी चर्चा अशी त्याची प्रतिमा.
पुढे तो राजकारणात येतो, पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहू लागतो पण त्याचा खास असा काही ठसा उमटत नाही. उलट त्याचा पक्ष फुटतो. प्रचंड करिश्मा असणारा तरूणांच्या गळ्यातील ताईत असणारा त्याचा भाऊ बंड करतो, आणि विरोधक म्हणून त्याच्या समोर उभा ठाकतो, हा प्रचंड धास्तावतो.
देशातलं राजकीय वातावरण बदलेलं,ज्याला बोट धरुन चालायला शिकवलं तो आता अंगावर येऊ लागला होता,
विरोधक थट्टा करत होते,समर्थक कासावीस झालेले,राजनितिज्ञ त्याच्याबद्दल आशावादी नसलेले,
त्याचे मित्र जोरात आणि जोमात असतात. हा त्यांच्याशी शत्रुत्व करू शकत नाही आणि धड मैत्रीही होऊ शकत नाही, अशी स्थिती असते.
याच काळात त्याचं हार्टचं ऑपरेशन होतं.काळजी आणखी वाढू लागते. तो जबाबदारी सांभाळू शकेल का अशी परिस्थिती,
आणि, अनपेक्षितपणे गोष्टी घडत जातात. त्याचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी येतं. पण विरोधक अशी खेळी करतात की हातातोंडाशी आलेलं मुख्यमंत्रिपद जातं. चिंतेची काजळी आणखी दाट होते.पण, विरोधकांचा तो डाव फसतो. तो मुख्यमंत्री होतो.
पण,जरा कुठे स्थिर होतो, तोवर जगभर मोठी महामारी येते. पण, अशा महामारीत तो एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे धीरोदात्तपणे उभा राहातो.
लोकांना ही जबाबदार वागणं आवडू लागतं,त्याचे विरोधक असणारे किंवा राजकारणावर न बोलणारेही त्याच्याविषयी चांगले बोलू लागतात.
तो आश्वासक, आपला वाटू लागतो. घरातला कर्ता माणूस वाटू लागतो. सर्वोत्तम मुख्यमंत्री वाटत जातो.त्याचे विरोधकही भांबावतात,
तो महासत्ताधिशासही अंगावर घेतो त्याची ही अनपेक्षित लोकप्रियता पाहून विरोधी पक्षाचे स्मार्ट नेतेही भांबावतात, आजही त्याला अडचणीत आणले जाते,त्याचे एकेक शिलेदार बंड करुन सोडून चालले आहेत पण तो डगमगला नाही,सत्तेला लाथ मारायची तयारी दाखवतो,आणि तडक गाशा गुंडाळून आपल्या घरी यावयास निघतो आणि त्याच्यावर प्रेम करणारे सच्चे कार्यकर्ते त्याच्या पाठिशी खंबीरपणे ऊभे राहून त्याचा उत्सुफुर्तपणे स्वागत करु लागले आणि याचे व्यक्तिमत्त्व त्यामुळे अधिकच झळाळून निघाले,
तो म्हणजे,
अर्थातच, उद्धव बाळासाहेब ठाकरे.
- सुहास रायनाडे
-