चार की पाच वर्षांपूर्वीची गोष्ट.जून महिना लागून दहा पंधरा दिवस झाले होते.पण पहिला पाऊस काही पडला नव्हता.तशातच आमच्या शिक्षकाना ऑनलाईन कामासाठी ॲंन्ड्राईड मोबाईल जवळ असणे गरजेचे होते.त्यासाठी तालुक्याच्या गावी गेले होते.मोबाईल घेतला आणि बस स्थानकात जाण्यासाठी रस्त्यावर चालू लागले. आणि अचानक निरभ्र आकाशातून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बसस्थानक जवळच होते पंचवीस तीस पावलांवर.पण तरीही पावसाच्या जोराने ओलेचिंब झाले.कपडे अंगाला चिकटले त्यामुळे चालताही येईना.आणि थांबले असते तर बस चूकली असती.शेवटची बस सहा वाजता होती.ती सापडणे गरजेचे होते.म्हणून रिक्षा करु म्हटले कारण कपडे ओले झाल्यामुळे लाजसुध्दा वाटत होती रस्त्याने चालताना.म्हणून रिक्षा वाल्याला हात दिला.तोवर चालत चालत बसस्थानक काही खूप लांब नव्हते राहिले.वाटले पावसामुळे ओले झालेलो आपण कुणाला दिसणार नाही.डायरेक्ट बस जवळच रिक्षातून ऊतरायचे आणि बसमधे बसलो म्हणजे कुणी पाहणार नाही.वाटले रिक्षावाला कमीत कमी दहा रूपये घेईल.बसस्थानक आले रिक्षा वाल्याला भाडे विचारले तर त्याने किती भाडे सांगावे मला?एकशेवीस रुपये! बापरे रिक्षावाल्याला म्हटले एवढ्याशा अंतराचे एकशेवीस रूपये? तो म्हटला हो पाऊस पडतोय ना? मी म्हटले हो ना.पाऊस पडतोय,मी ओलीचिंब झालीय लाजवाटत होती म्हणूनच मी एवढ्याशा अंतरासाठी रिक्षा केली.आणि तुम्ही त्याचा फायदा घेत आहात की काय? म्हणजे अडचण आणि अडवणूक ह्या धोरणाचा मला त्यावेळी