Bluepad | Bluepad
Bluepad
मी आणि वादळी पाऊस
suwarta
suwarta
23rd Jun, 2022

Share

मी आणि वादळी पाऊस
तर मी आणि वादळी पावसाच्या खूप छान आठवणी आहेत.त्या मरेपर्यंत नाही विसरणार मी.खूप छान मार मिळाला होता मला वादळी पावसामुळे.कसे विसरू त्याला?विसरताच नाही येणार.
    तर मी पाचवीला होते तेव्हाची गोष्ट,हिवाळ्याचे दिवस होते.घरी कोणाच्या तरी लग्नाचे आमंत्रण होते.लग्न सायंकाळी होते, आणि लग्नघर नदीच्या पलीकडील बाजूला होते.आमचे घर नदीच्या अलीकडे होते.आईवडिल आणि भाऊ यांनी लग्नाला जाण्याची तयारी केली.मलाही बोलावित होते पण मी नाही गेले.मग आई-वडिल व भाऊ तिघेच जण दुपारी एक दिड वाजता लग्नाला जायला निघाले.घरातील पसारा  आवरत आणि झाडझुड करता दुपारचे दोन अडिच झाले होते.तितक्यात आकाशात काळे ढग गोळा झाले,विजा चमकू लागल्या,अगदी कधी नव्हे ईतक्या जोराने वादळ वारा वाहु लागला सोबत विजांचा कडकडाट गडगडाट, आणि अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना गारांचा पाऊस सुरू झाला.गाराही ईतक्या मोठमोठाल्या की जणू लिंबूच्या आकाराच्या.जोरदार पावसाने घर गळायला लागले, सर्व लोक आपापल्या घरातील गळालेले  पाणी गोळा करून बाहेर फेकण्यात लागू लागले.बाहेर गेलो की विजांची भिती.आणि मनात आई-वडिल भाऊ यांची चिंता ,काय झाले असेल?कुठे असतील आई दादा भाऊ?पावसात सापडले असतील का?घरी येण्याचा रस्ता नदीतून होता नदीला पूर आला असेल तर? बापरे नको नको ते विचार मनात येत होते.त्या काळी मोबाईल नव्हते की फोन करून हालचाल विचारू शकले असते.लॅंडलाईन होते,पण मोजक्याच घरी जसे श्रीमंत लोक.मनात नको नको ते विचार येत होते.आईवडिल भाऊची काळजी वाटत होती.रडू येत होते.तसेच रडता रडता घरात गळत असलेले पाणी बादली कढईत गोळा करून बाहेर फेकत होते.पावसात कुणाला दिसणार डोळ्यातील अश्रू?पण समोरच्या घरातील मावशींना माहीत होते की ईंदिराचे आई-वडिल भाऊ लग्नाला गेलेत आणि ती घरात एकटीच आहे.वरून हा गारांचा मुसळधार पाऊस.घरातच नदी साचली होती.कौलांचे घर होते.मावशीला एकदम आठवले आणि तिने शरीफ दादाला सांगितले की ईंदिरा घर मे अकेली है.उसे मदद करो ऊसके घर जाओ.तेव्हा कुठे शरीफ दादा आणि शाकिर घरी आले आणि मला घरातील साचलेले पाणी बाहेर फेकण्यास मदत करू लागले.पण,तिकडे आई-वडिलांचा जीव मुठीत होता माझ्या काळजीने की बाई घरी एकटी आहे,ईतका मुसळधार पाऊस,गारा पडताहेत,विजा होताहेत घर पाहीले तर कौलांचे विजांचा काय भरवसा?गारांमुळे कौलेच फुटली आणि बाई गारांमधे सापडली तर?मी तर त्यांच्या काळजाचा तुकडा होते.काय अवस्था झाली असेल त्यांची ?चांगल्या तीन चार तासात पावसाचा जोर कमी झाला,साधारण रात्रीचे आठ साडेआठ झाले होते, आणि आई-वडिल भाऊ घरी आले.त्यांना पाहून खूप आनंद झाला.पण रडुही येत होते.ईतका भयाणक पाऊस मी तेव्हाच पाहीला होता.आणी आई-वडिल भाऊ यांना सुखरुप पाहून आनंद होत होता.आणि मला सुखरुप पाहून त्यांना आनंद झाला होता.पण तरी त्या मागे वडिलांना राग होता.तो हा की ईतक्या वेळेत त्यांच्या काळजाला माझ्या काळजीने किती वेदना झाल्या असतील?मी समजू शकत होते.जर चारही जण सोबत असतो तर ईतकी काळजी कोणालाच वाटली नसती.आणि ईतक्या पावसाने नदीला पूरही आलेला होता,लग्नाघरची मंडळी आई-वडिलांना मुक्कामाचे सांगत असतानाही माझ्या काळजीने ,स्वताचा जीव धोक्यात घालून आईवडिल  भाऊ  नदीला पूर असूनही कसेतरी घरी आले होते, की बाईचे काय झाले असेल?ती कशी असेल? आणि समजा पूरात नशिबाने साथ नसती दिली तर काहीही होऊ शकले असते.सर्व मनात घालमेल होत असणार वडिलांची.मग काय ?वडिलांनी खूप मारले मला.आधीच पावसाच्या पाण्याने अंग ओले होते आणि वरुन मार वडिल काही साधं मारत नसत आम्हाला?चुलीतील लाकुड असो की मुक्के असो.ओठ सुजून जात मार खाऊन खाऊन,तसं मारल वडिलांनी.पण त्या मारामागचे प्रेम मला कळत होते.
तर असा हा पाऊस गारा पाच सहा महिने सुध्दा वितळल्या नव्हत्या,अगदी प्रत्येक घरावर बर्फाचा डोंगर साचला होता,रस्यावर बर्फाचा रस्ता तयार झालेला होता.आम्ही शाळेत जायचो तेव्हा आजूबाजूला साचलेला हा बर्फाच्या डोंगरातून ते गोळे ऊचलायचो आणि जेव्हा रस्यावर फेकायचो, तेव्हा असंख्य हिरे  रस्त्यावर चमकताना दिसत.
अगदी शिमल्याचे रुप पिंपळनेर शहराला आले होते.विडिओ शुटींग सुध्दा केलेली होती त्या गारांचा पावसाची, आणि पून्हा पून्हा टि्वी वर ती दाखविली जाई.जेव्हा कुणाला त्या भयाणक पावसाची आठवण येइ.तेव्हा त्याचे भयाणक स्वरुप टि्वी मधे कळायचे की कसे आक्राळ विक्राळ रुप त्या पावसाने तेव्हा धारण केले होते.आता तो पाऊस म्हणजे अजुनही एका लोककथे सारखा झालाय. जेव्हा कुणी घरी पाहुणे येत तेव्हा तेव्हा केबल वाल्याला विनंती करून त्या पावसाची शुटींग दाखविण्याची विनंती केली जात असे.अजूनही पावसाचे नाव काढले म्हणजे लोक म्हणतात की तसा पाऊस आजवर झालाच नाही,
तर असा हा वादळी पाऊस आणि मी त्या बिच्यार्या पावसामुळे खाल्लेला मार मला नेहमीच आठवणीत राहील.

185 

Share


suwarta
Written by
suwarta

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad