आपलं आयुष्य खुप सुंदर आहे...
आपलं आयुष्य खुप सुंदर आहे,
काही लोकांसाठी खराब (बरबाद) नाही करायचं.स्वतःवर प्रेम करत
आपण आपल्यातच आनंद शोधत राहायचं.
मनात खुप साठलं कि लगेचच रित (खाली) करायचं,
कुढत राहण्यापेक्षा बोलून रिकामं व्हायचं,
दुःख सांगताना ऐकणारा काय म्हणेल
हे जरा थोड बाजुला ठेवायचं.
प्रेम करायला कोणी शोधत नाही बसायचं,
प्रत्येकाची आवड वेगळी असती
हे ज्याच त्यानं समजून घ्यायचं असतं
हेच तर जीवन जगायचं.
जे येतील त्यांना जपायचं
मित्रांच्या गर्दीत स्वतःला हरवत,
आई वडिलांच्या प्रतिष्ठेला जपायचं.
त्रास कोणाला होत नसतो,
पण क्षुल्लक कारणासाठी जिव द्यायचा नसतो. बाकी,
आपलं आयुष्य खुप सुंदर आहे.
ते सहज आणि आनंदात जगायचं.
.... ✍गोकुळ कुंभार.