Bluepad | Bluepad
Bluepad
स्त्री जन्माची कहाणी 💙
K
Komal Kadam
23rd Jun, 2022

Share

💐❤️🙏 दोन मिनिट वेळ काढून नक्की वाचा..❤️💐🙏
💝शेवटचा निरोप समारंभ.💝💚💝
💙आज आयुष्यात पहिल्यांदाच💙
💙तिला इतका मानपान मिळाला,💙
💙असा मानपान मिळण्यासाठी💙
💙तिने पुनः जन्मा यावे💙
💙असा विचार क्षणभर डोकावला...💙
💚आज तिच्या घरी सर्वच आले,💚
💚माहेरचे, सासरचे, मानाचे💚
💚अन पानाचे...💚
💚तिने नाही कुणाच्या💚
💚पायाला हात लावला,💚
💚तरी कुणालाच तिचा💚
💚राग नाही आला...💚
💚खरचं आज तिचा💚
💚पाहुणचार वेगळाच झाला...💚
💚खरंच हा शेवटचा निरोप💚
💚समारंभ थाटात पार पडला...💚
💜ती आज पहाटे उठली नाही,💜
💜म्हणून कुणीच तिला💜
💜हटकले नाही...💜
💜उशिरा का असेना तिने उठावे💜
💜सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या,💜
💜खरंच आयुष्यात असा💜
💜क्षण पहिल्यांदा आला... 💜
💜हा शेवटचा निरोप💜
💜समारंभ थाटात पार पडला...💜
💝नेहमीच आटप म्हणून💝
💝कटकट करणारा नवरा💝
💝आज स्वतःच तिची💝
💝तयारी करायला लागला,💝
💝तिने त्याचं💝
💝आज्ञा पालन नाही केलं💝
💝तरी साश्रू प्रेमाने तिला 💝
💝भिजवू लागला... 💝
💝खरंच आयुष्यात पहिल्यांदाच💝
💝नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला...💝
💝हा शेवटचा निरोप 💝
💝समारंभ थाटात पार पडला...💝
💚तिची नवी साडी नेहमीच💚
💚हसण्याचा विषय झाला, 💚
💚आज सर्वांनी तिला 💚
💚पैठणीचा आहेर दिला...💚
💚खणखणत्या बांगड्यांचा💚
💚चुडा भरला, 💚
💚तरी आज कुणाच्या डोळ्यात💚
💚उपहास नाही दिसला... 💚
💚खरंच आयुष्यात पहिल्यांदा 💚
💚तिच्या सौंदर्याचा गौरव झाला... 💚
💚खरंच हा शेवटचा निरोप💚
💚समारंभ थाटात पार पडला...💚
💙आज तिच्या डोळ्यात💙
💙स्मित हास्य, 💙
💙दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र💙
💙आसवांचं रहस्य... 💙
💙तिचे हात कुणाचे💙
💙अश्रू नाही पुसायला गेला,
💙तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळला...💙
💙खरंच आयुष्यात पहिल्यांदाच💙
💙जग तिच्यासाठी रडला...💙
💙हा शेवटचा निरोप💙
💙समारंभ थाटात पार पडला...💙
💟आज तिला कुणाचीच💟
💟पर्वा नव्हती,💟
💟सगळ्या बंधनातून ती मुक्त होती... 💟
💟आक्रोश करून पुनः तिला💟
💟बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला,💟
💟आज पहिल्यांदा जगाला💟
💟तिचा मोह झाला... 💟
💟खरचं हा शेवटचा निरोप 💟
💟समारंभ थाटात पार पडला...💟
💚जिवंतपणी नेहमीच तिच्यावर💚
💚जबाबदारी राहिली,💚
💚थोडीशी चुकली तर💚
💚तिला धारेवर धरली...💚
💚आज सर्व त्यागून ती💚
💚निर्धास्त झाली,💚
💚तरी गुलाबाची शेज सजवून💚
💚सर्वांनी तिची कदर केली...💚
💚आज पहिल्यांदा💚
💚काट्याशिवाय गुलाब 💚
💚तिच्या वाट्याला आला... 💚
💚खरंच हा शेवटचा निरोप💚
💚समारंभ थाटात पार पडला...💚
💜आज प्रत्येकाने तिचा💜
💜सोहळा पाहिला, 💜
💜बाकी ती शांत होती💜
💜तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला...💜
💜घरचाही रडला, दारचाही रडला,💜
💜पाठचाही रडला, पोटचाही रडला...💜
💜लहानही रडला, मोठाही रडला,💜
💜जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला...💜
💜मुलांनी एकच गलका केला,
💜तेव्हा तिच्या स्त्रीपणाला💜
💜खरा अर्थ प्राप्त झाला...💜
💜खरचं हा शेवटचा निरोप💜
💜समारंभ थाटात पार पडला...💜
💝कविता स्त्री वरती लिहावीसी वाटली,💖
💝सर्व जण स्त्रियांना योग्य सन्मान,प्रेम देतोच 💖
💝पण कविता वाचून अजून भरभरून प्रेम दया💙
💝त्या माऊलीला जी सर्वासाठी खपते,झिजते.💙
💝नेहमी सकारात्मक विचार करा...
💙स्त्री जन्माची कहाणी 💙
💙प्रत्येकाच्या 💙
💙डोळ्यात आसवे आणणारीच असते.💙
💙RESPECT WOMEN...💙💝💙

116 

Share


K
Written by
Komal Kadam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad