प्रिय, देवबाप्पा तुला दंडवत. देवबाप्पा नशिबी तु जे बी दिलं,त्याचा आनंदाने स्वीकार केला. हया आशेन की ,तुझी कृपा होईल आणि हे दिस बी पालटतीन. परिस्थिती बदलेल आणि आयुष्याला सोन्याचे दिस येतील म्हणून जिवाचा आटापिटा करून,पशु वानी काबाडकष्ट करतो देवा! पण तुझी काही कृपा होईना. अठराविसाव्ये दारिद्रय आमच्याच भाग्याला का म्हणून?ते कळतच नाही देवा! पुर्व जन्मीचे शाप म्हणून ते सुद्धा आम्ही स्विकारतो. हया पृथ्वी तलावर जणू आम्ही ओझचं असल्याचे भासते.सगळया दुःखाचे खापर आमच्याच माथी का फोडलं जाते कळत नाही. कधी दंगलीत कुचलले जातो, तर कधी मोठ्यांच्या तानाशाहीत, आणि निसर्ग जरा ज्यादाच मेहेरबान.कधी ओला दुष्काळ,तर कधी कोरडा दुष्काळ, कधी संपुर्ण उद्ध्वस्त करणारी वादळे,तर कधी संपुर्ण वाहुन नेणारे महापूर,आज इथे तर उद्या तिथे.जन्मापासुन ते शेवटच्या श्वासापर्यंत तडजोड, तडजोड आणि फक्त तडजोड.देवा किती भयावह ते महापुर! स्वःताच्या नजरे पुढं आपली माणसे कधी हातात येतात, तर कधी निसटून जातात, सर्व भयंकर विखुरलेले आणि ते पुन्हा सावरायला आयुष्य पणाला लागते. देवा माझ्या वेदना तुला कधी कळतील, की मी तुला भावनाहीन दगडच समजावे!देवा भांडायला आणि जाब विचारायला तुच तर एक हक्काचा आहेस.
देवा दुःख पण एवढे नको रे देऊ की, जगणं कठीण होईन.