Bluepad | Bluepad
Bluepad
जीवन सुंदर आहे बरं का!
T
The Digvijay Patil
23rd Jun, 2022

Share

जीवन सुंदर आहे !
आपण जीवन जगतो. दैनंदीन जीवनात अनेक कामे,अनेक विचार करतो.या विचारांच्या दुनियेत अनेक विचार येतात,आणि आलेच पाहिजेत कारण विचार करण्यांची क्षमता फक्त मानवाकडे आहे , आणि दुर्देव असे कि ती आपण आजकाल हरवत चाललोय . तर विचार, हे माझ्याबरोबरच का वाईट घडते, मीच का करू असे खूप....काही...मनात येत असतात .मनात येणारे प्रत्येक विचार हा बोलून स्पष्ट होईलच असे नाही पण विचार ते आता विचारच..आणि ह्या विचारात अडकलेले आपले मन असते.आपले सध्याचे जीवन हे धावपळ,स्पर्धा,इंटरनेट यातच बिझी झाले आहे ह्यात काही वाद नाही.पण यातही आपण आपल्याला समजून घेतो का?..तर याचे सोपं उत्तर आहे..नाही!.. हो आजकाल आपण जास्त वेळ मोबाईल,लॅपटॉप, whatsApp, Facebook, Instagram, telegram ज्याला आपण सोशल मिडिया म्हणतो. यातच गुंतातलेलो असतो आणि ह्याच सोशल मिडिया मुळे आपण अबोल,आणि व्यस्त झालो आहे. यातच खुप वेळा आपण नैराश्याच्या पाशात अडकतो.एखादी व्यक्ती जर नैराश्यातून जात असेल तर तो कमी बोलतो,तो एकांतात राहायला पसंत करतो,नवीन काहीच करण्याची रुची वाटत नाही, आत्मविश्वास गमावून बसतो .आपण जरी अश्या व्यक्ती सोबत राहत असतील तर आपल्याला ही काहीच समजत नाही,तो normal आहे असे वाटते आणि तो ही तसेच दाखवतो,पण त्याच्या मनात तो आतून तुटत असतो.
नैराश्य ज्याला आपण Depression असं बोलतो, आता हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येते . ती कारणे जास्त वेळा घरगुती असतात, परीक्षेत अपयश, भविष्याची चिंता , तर काहींना प्रेमात धोका मिळाल्यामुळे ते तणावात जातात . यातूनच ते टोकाचे पाऊल उचलतात ते म्हणजे आत्महत्या. अरे काय हे ज्यांनी आपल्याला सुंदर असे हे जग दाखवले ते आपले निस्वार्थी आई- वडिल त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्याही आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतील ना, ज्यावेळी असा आत्महत्येच्या विचार येतो तेव्हा त्यांच्याशी बोलत चला. नहितार एकदाचे का हे विचार येणे चालू झाले तर नंतर याचे रूपांतर depressed मनात होत जाते आणि त्याचा शेवट म्हणून लोक आत्महत्या करतात.भारतात आत्महत्येच्या मागे नैराश्य हेच कारण निर्देशनास आले आहे.आता मागाचेच उदाहरण आहे सुशांत सिंह राजपूत हा एक उत्कृष्ट अभिनेता होता, त्याने सिनेसृष्टीत मोठ् नाव, खूप सारा पैसा पण तो सुद्धा नैराश्याचा शिकार झाला अण् शेवटी आपणास माहीत आहे..कुठे गेला कमावलेला पैसा...
याहून अधिक चांगले की आपण आपले मन मित्रांकडे किंवा आपल्या कुटुंबातील कोणाकडेही मोकळं केल पाहिजे.जगातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे.आणि कोणताही प्रश्न,अडचण ही जीवनापेक्षा महत्त्वाचा नाही.जीवन हे विनामूल्य आहे ते एकदाच मिळते आणि त्याचा आनंद घ्यावा,रोज येणारा प्रत्येक क्षण हा अंनादात जगाला पाहिजे. या सुंदर जगात रमून तर बघा, आयुष्य जगताना खूप सहजतेने जगायचं.
✍🏻 दिग्विजय पाटील

171 

Share


T
Written by
The Digvijay Patil

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad