Bluepad | Bluepad
Bluepad
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत!
वेदांत बावनकर
23rd Jun, 2022

Share

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे. शेती म्हटलं की, पाण्यावर अवलंबून असते. परंतु आपल्या यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.
दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत!
परंतु अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागांमध्ये दुष्काळ पसरतो अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची काय अवस्था होते.
हे कल्पना आम्ही आजच्या लेखामध्ये बगणार आहोत. चला तर मग पाहूया दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध . . दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत. मी एक शेतकरी बोलतोय. होय, खरंच मी एक शेतकरी बोलतोय नुसता शेतकरी नसून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आहे. मला छोटा शेतकरी म्हटलं तरी चालेल कारण माझी जमीन केवळ दोन एकरंच आहे.
व मी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील शेतकरी आहे. मराठवाडा म्हटला की, तुम्हाला कळलेच असेल की मराठवाड्यामध्ये नेहमी दुष्काळ पसरलेला असतो. मराठवाडा भागामध्ये पुरेसा पाऊस पडत नाही. ज्या जमिनीवर शेती व्यवसाय करतो, माझी ती जमीन फारशी सुपीक ही नाही आणि नापिकी ही म्हणता येणार नाही. कारण, माझ्या आजोबा पणजोबांच्या पिढ्यानपिढ्या त्याच जमिनीवर जगत आलेल्या आहेत व ही परंपरा मीदेखील जोपासतो. मला माझ्या या शेत जमिनीवर खूप प्रेम आहे; पण हे प्रेम असून भागणार का?
शेती हा पूर्णपणे व्यवसाय पाण्यावर अवलंबून असतो म्हणजे पाण्यावर आणि आपल्या देशामध्ये पाण्याचा एक मात्र स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा शेतामध्ये पीक बहरत असते.
माझी शेती च्या भागामध्ये आहे त्या भागांमध्ये दूर पर्यंत कोणतीही नदी वाहात नाही किंवा पाण्याचा इतर कुठलाही स्त्रोत नाही. माझ्या शेताच्या आज बाजूने लहान-मोठा ओढे वाहतात पण त्यांना देखील पाणी नसतात केवळ पाऊस पडला तरच आमच्या भागांमध्ये पाणी पाहायला मिळते.
इतर वेळेस मी पाण्याचा एक थ्थेंब पाहण्यासाठी तरसत असतो. पावसाळ्यामध्ये चार महिने पुरेसे पाणी असते परंतु जसा उन्हाळा चालू होतो तसा नद्या-नाल्यातील संपूर्ण पाणी आटून जाते व माझ्या शेत जमिनीला भेगा पडतात.
अशा परिस्थितीमध्ये मृगाचा नक्षत्र आल्यावर आम्हा शेतकऱ्यांच्या डोळे फक्त आभाळाकडे वळलेले असतात. कधी एकदा पाऊस पडतो आणि आमचे शेत जमीन ओली होते व आम्ही शेती मध्येच काहीतरी धान्य पिकवतो हे स्वप्न आम्ही दरवर्षी डोळ्यांमध्ये ठेवून असतो.
कुठे दिसतोय का, आमचा काळा विठोबा! काळा विठोबा म्हणजे ढग हो! पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा संपून टाक काळे झालेले असते म्हणून आम्ही ढगाला काळा विठोबा असे म्हणतो. मृगाचा नक्षत्र चालू झाला की, शेतजमीन नांगरायची व कुळवायची, मातीचे ढिगारे फोडायचे शेतातील काटे कोरडे काढायचे आणि पावसाची वाट बघत बसायचे.
संपूर्ण दिवस पावसाची वाट बघत पावसाच्या पाण्यात नाहीतर मी उन्हामध्ये भिजत असतो. पण पावसाच्या पाण्याचा पत्ताच नाही. तुमच्या गावातील तर काही बायका पिण्याच्या पाणी साठी काही कोसांच्या अंतरावर जातात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कधीतरी सोसाट्याचा वारा सुटतो आभाळ भरून येतात आणि पावसाचे दोन-तीन तथेंब पडायला लागतात. क्वचित कधीतरी कुठेतरी पावसाच्या धारा पडतात ते पाहून माझे मन तर इतके भरून येते की मी पावसामध्ये नाचू लागतो.
तसेच माझ्या सोबत आमच्या गावातील लहान-मोठी म्हातारीकोतारी माणसेसुद्धा भिजून निघतात. पावसामध्ये आम्हाला फक्त शरीरच भिजत नाही तर मन सुद्धा भिजून निघते.
त्या पावसाच्या दोन तीन धारा पाहुणा आमच्या मनामध्ये शेतीमध्ये काहीतरी पिकवण्याचे आशा निर्माण होते व आम्ही शेतीमध्ये बी बियाणे घेऊन पिकविण्यासाठी जातो. बी बियाणे टाकतो आणि ते बी बियाणे उगवून येईपर्यंत माझे संपूर्ण लक्ष माझ्या शेतीकडेच असते.
यावेळी माझी ग्रुप पाहण्याकडे जराही लक्ष नसेल माझ्या शेतीमध्ये धान्य कधी होऊ नये याकडे असते आणि धान्य सुद्धा येते. हळूहळू धान्य वाढायला लागते तसा माझा जीवात जीव येतो.
जेव्हा धान्य माझ्या गुडघ्याला लागायला लागते तेव्हा माझे स्वप्न पूर्ण झाले असे मला वाटते. आणि मी माझ पुढचे वर्ष या पिकावर जाईल याचे स्वप्न देखील पाहायला लागतो माझा परिवार सुखी येईन माझ्या घरामध्ये थोडीफार पैशाची मदत होईल असा विचार करून मी त्या धान्या कडे पहात असतो. परंतु पाण्याच्या अभावी एवढे मोठे झालेले धान्य हळूहळू वाळायला लागते. शेवटी फुलांपर्यंत आलेले धान्य वाळून जाते. कोरडा दुष्काळ ग्रस्त आमच्या शेतकऱ्याची पूर्ण स्वप्ने त्या पिकासोबत जळून जातात. डोक्यावर सावकाराचे कर्ज आणि शेतीतून एक रुपयाही न मिळाल्याने आम्हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडे आत्महत्या या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही.
सरकारची मदत देखील आम्हा पर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी करायचे तरी काय?
आम्ही आमच्या डोळ्यांमध्ये शेतामध्ये भरलेले पीक आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे उपाय, आपल्या मुला-बाळांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न बघून लागतो.
संपूर्ण देश हा आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर जगतो मग कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती असेल तर उद्याचा जग कसा जगेल? सर्वांना अन्न कसे प्राप्त होईल,?
त्यामुळे अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्या जवळ आत्महत्या शिव्या दुसरा कुठलाही पर्याय रहात नाही. वर्षभरातील कित्येक शेतकरी हे केवळ दुष्काळाला कंटाळून त्यांचा जीव गमावतात.
तर मित्रांनो ! ” दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Dushkalgrast Shetkryach Manogat Marathi nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

172 

Share


Written by
वेदांत बावनकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad