Bluepad | Bluepad
Bluepad
मेघा रे मेघा रे
वसुधा जावकर
वसुधा जावकर
23rd Jun, 2022

Share

यंदाचा पाऊस हा मनातल्या विचारांसारखा आहे , आला तर जोरात , नाहीतर सरीवर येतो .विचाराना जसा मनाचा लगाम लागत नाही तसेच पावसाचे झाले वाटते . श्रावण सरिंसारखा येतो , मागून ऊन येत . तो लांबलाय की थांबलाय ? रुसलाय की कुठे फसलाय ? येरेयेरे पावसा म्हणायची वेळ येते की काय , का पडत नाहीत अंगणात रिमझिम पावसाचे पाय ? संपत आला जून पाऊस नाही अजून . पावसाळ्याची जराशी झलक दाखवून गायब झालाय , वाट पाहावी लागणार बहुतेक त्याच्या मनसोक्त आगमनाची , त्याच्या धुवाधार बरसण्याची .आता ही खिडकिमधून आकाशाकडे डोळे लावून बसलेय मनात एक गाणे रुंजी घालत आहे ; मेघा रे मेघा रे मेघा रे मेघा रे मत परदेस जा रे . . .

168 

Share


वसुधा जावकर
Written by
वसुधा जावकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad