Bluepad | Bluepad
Bluepad
पहिल्यांदा डेटवर जात असाल तर 'ह्या' टीप्स पाळा
R
Rajni Ghate
23rd Jun, 2022

Share

आपल्याला जी मुलगी आवडते तिच्यासोबत पहिल्यांदा डेटवर जायचं म्हणजे आपली जरा धांदलचं उडते. त्यात मुलगा म्हणून संपूर्ण डेटची जबाबदारी आपल्यावर असते. त्यामुळे साहजिकच डेटमध्ये काय करावं, काय नाही, कसं वागवं याविषयी आपला खूप गोंधळ झालेला असतो पण थांबा ! गोंधळून जाऊ नका आजच्या लेखात दिलेल्या गोष्टी फक्त फॉलो करा. शंभर टक्के ती तुम्हाला हो म्हणेल.

पहिल्यांदा डेटवर जात असाल तर 'ह्या' टीप्स पाळा

  • तिचा हीरो दिसण्यासाठी तयार व्हा –
एका सुंदर मुली बरोबर डेटवर जायचं म्हणजे आपल्यालाही हीरो दिसणं महत्त्वाचं आहे ना! म्हणूनच सर्वात आधी तर अस्तावस्त वाढलेली दाढी केस व्यवस्थित ट्रीम करा. डेटवर जाण्याच्या चार दिवस आधीपासून चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या याने आपल्या चेहेऱ्यावरचं टॅन कमी होईल. चेहरा नितळ, ग्लोइंग दिसेल. मुलींना स्वच्छता खुप प्रिय असते. त्यामुळे नखं, केस, दात याकडे अधिक लक्ष दया. डेटला जाण्याआधी मिंट किंवा माऊथ स्प्रे मारून जा म्हणजे तिच्या बाजूला बसून बोलताना आपल्या श्वासाचा दुर्गंध येणार नाही. ज्या दिवशी डेटला जाणार असाल त्या दिवशी शक्यतो सोबर वाटतील असे कपडे घाला. सौम्य रंगाचे शर्ट निवडा. म्हणजे तुम्ही जेन्टलमेन आणि स्टायलिशही दिसाल. कपड्यावर मंद सुवासाचा अधिक काळ टिकणारा परफ्युम मारायला विसरु नका
  • जागा कोणती निवडाल –
तिला डेटवर घेऊन जाण्यासाठी असं ठिकाण निवडा जिथे आपल्याला शांतपणे तिच्याशी बोलता येईल. त्यासाठी एखाद्या रेस्तोरंटमध्ये एक टेबल बुक करा. टेबलच्या आजूबाजूला मस्त हिरवंगार गवत, फुलं, सुंदर कारंजा असलेलं तळ इत्यादी असेल याची काळजी घ्या म्हणजे आपली डेट रोमॅंटिक वाटेल किंवा एखाद्या समुद्राच्या ठिकाणी तिला घेऊन जा जिथे शांतता असेल. डेट संध्याकाळी ठरवा म्हणजे मावळणारा सूर्य संध्याकाळची ती मंद धुंद हवा आपल्या डेटला चार चाँद लावेल. रात्री चांदण्यांच्या प्रकाशात कँडल लाईट डिनर सुद्धा उत्तम पर्याय आहे.

डेटला गेल्यावर काय कराल? –
  • धीराने घ्या –
पहिलीच डेट म्हणून आपण अगदीच उत्साहात असतो किंवा काही लोक अगदीच घाबरलेले, नर्व्हस असतात अशा परिस्थितीत आपल्याकडून काही न काही चूक होणार हे नक्की असतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला असं काहीही होत असेल तर आधी जिथे आहात तिथे शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. आधीच नकाराची फिकीर करु नका. आज तुम्हाला तुमची बेस्ट बाजू दाखवायची आहे हे लक्षात घ्या.
  • तिचा अवघडलेपणा दूर करा –
मुलांच्या तुलनेत मुली लगेचच मुलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. ती तुमच्या सोबत डेटवर आली आहे म्हणजे ती जरा लाजणार, अबोल राहणार किंवा तुमच्या प्रश्नांवर जेवढ्यास तेवढी उत्तरं देणार त्यामुळे ती बोलत नाही मग मी एकटाच काय बोलू! असं करु नका डेटच्या सुरूवातीला आपल्याला तिचा अवघडलेपणा दूर करावा लागेल पण नंतर ती बोलू लागेल म्हणून डेटच्या सुरुवातीला तुम्हालाच तिच्याशी अधिक बोलवं लागेल हे लक्षात घ्या.
  • काय बोलणार ह्याचा विचार करा –
तिच्याशी बोलताना कोणत्याही परिस्थितीत आपला आवाज वाढता कामा नये. आपलं बोलणं हे मोकळं, थट्टा मस्करीचं असावं. तिच्याशी संवाद साधताना आपण तिला जज करु नये. आपल्या बोलण्यात रटाळपणा नसावा. कारण मुलींना तेच तेच प्रश्न विचारलेले आवडत नाही. मुख्य म्हणजेच तिच्या आधीच्या नात्याविषयी आजच विचारू नका. तिची आवड निवड यावर अधिक बोला. तुमच्या बोलण्यातून तिची स्तुती येऊ दया पण अतिशयोक्ती टाळा. आपल्या बोलण्यावरच मुलीचा होकार, नकार अवलंबून असतो म्हणून जे बोलाल ते काळजीपूर्वक बोला.
  • तिला स्पेशल वाटू दया –
आपल्याला कोणी स्पेशल असल्याची वागणूक द्यावी हे मुलींना वाटत असतं. डेटला गेल्यावर तिला स्पेशल वाटू देण्यासाठी तीचं कौतुक तर करायचं आहेच सोबतच आपल्याला तिच्या आवडी निवडीला अधिक प्राधान्य द्यायचं आहे. तिला बसायला खुर्ची देणं, तिच्यासाठी दरवाजा उघडणं, तिला फुलांचा सुंदर गुच्छ देणं, मेनू कार्ड तिच्याकडे देत तिला जेवणाची निवड करण्यास देणं, गिफ्ट देणं इ. डेटिंग एटिकेट शिकण्यासाठी हा व्हिडिओ बघा.
https://youtu.be/OkrxjbXbytE
  • अती शायनिंग मारू नका –
डेटला गेल्यावर अनेक मुलांना तिला इम्प्रेस करण्यासाठी मोठेपणा करण्याची सवय असते म्हणून ते माझ्याकडे हे आहे ते आहे करतात पण मुलींना तिला इम्प्रेस करण्यासाठी खोटं बोलत आहात हे कळतं. ती तिथून निघून जाऊ शकते म्हणून तिच्याशी खोटं बोलू नका. तुमच्याकडे जे आहे जे नाही हे खरं सांगा. तुम्ही खरे आहात ही गोष्ट तिला मोठेपणा गाजवण्यापेक्षा जास्त आवडेल.
  • तिचे उत्तर लगेच विचारू नका –
आपली डेट पूर्ण झाल्यावर तिचा होकार आहे की नकार हे लगेचच त्यावेळी विचारू नका तिला वेळ दया उतावळेपणा करु नका.
या लेखातून बऱ्याच गोष्टी कळल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्यांदाच डेटवर जाणाऱ्या मित्रालाही हा लेख पाठवा.

394 

Share


R
Written by
Rajni Ghate

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad