Bluepad | Bluepad
Bluepad
'हा' विचार कसे जगायचे असते हे शिकवेल
K
Khusbhu Ghate
23rd Jun, 2022

Share

परवा वाचनात मी एक फार सुंदर वाक्य वाचलं. ते वाक्य म्हणजे 'आपलं चारित्र्य हे उतार चढावांचा पुरावा असतं. जेव्हा तुम्ही खूप मोठी उंची गाठता तेव्हा नम्र राहा. संकटात बलवान राहा आणि जेव्हा या दोन्हीच्या मध्ये असाल तेव्हा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा.' आता प्रत्येक वेळी आपण असं वागतो का? हे विचार करण्यासारखे आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. त्यातून कोणी तरून जातं तर कोणी तिथेच अडकून पडतं. खाचखळगे, अडचणी याशिवाय आयुष्य अपूर्णच असतं. आलेल्या संकटावर मात करणं, यशाच्या शिखरावर असताना नम्र राहणं आणि अशावेळी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणं हे जीवन जगण्याचं एक सूत्र आहे. जे प्रत्येक क्षणी आपण वापरले तर खूप कमाल घडू शकते.

'हा' विचार कसे जगायचे असते हे शिकवेल

जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगला जातो तेव्हा डोंगर चढून त्या उंचावर जाऊन ते संपूर्ण शहर पाहण्यासाठी सगळेच खूप एक्सायटेड असतात. मोठ्या उत्साहाने पायथ्यापासून सुरू झालेला ट्रेक जेव्हा मध्यावर येऊन थांबतो तेव्हा कित्येक जणांचे अवसान गळून पडून पडते. कोणी तिथूनच माघार घेतं तर कोणी निम्म्या त्या अगदी डोंगराच्या माथ्यावर पोहचायच्या अगदीच आधी माघार घेऊन मोकळं होतं. पण पायथ्यापासून ते शिखरापर्यंतचा प्रवास करणाराच यशस्वी ठरतो. कारण त्याच्या मनाची शक्ती खूप जास्त असते. ज्यावेळी एखादी गोष्ट आपण आपल्या मनात पक्की ठरवतो तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. तेवढी ताकद आपल्या मनाच्या शक्तीत असते. ज्याच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. बरं, हा डोंगर माथ्यावर पोहचायचचा प्रवास सरळ नसणारच. मात्र या प्रवासात ज्यांनी आपल्याला मदत केली किंवा आपल्या मनाने आपल्याला उभारी दिली त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं.

संकटकाळी देखील जो स्वतःच्या ताकदीवर, क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जातो यश त्यालाच मिळते. अडचणी, संकटे माणसाचे आयुष्य कठीण करून टाकतात. त्यातून अनेक जणांची उमेद कमी होते. कोणी संकटाला घाबरून आपला रस्ता बदलतात. स्वप्नं पाहणं सोडून देतात. इच्छा मारतात. ही सगळं लक्षणं एका आत्मविश्वास हारून बसलेल्या माणसाची आहेत. तेव्हा अशी व्यक्ती बनायला हवं जी प्रत्येक प्रसंगात ताकदवर राहील. तसं पाहायला गेलं तर या गोष्टी आपल्याला माहिती असतात. लेचपेचं राहून, रडून जी परिस्थिती आपल्यावर आली आहे ती बदलणारी नसते. पण हे केवळ माहिती असूनही उपयोग नसतो तर ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्याची सवय आपण स्वतःला लावून घ्यायला हवी.

सतत प्रयत्न करणाऱ्या माणसाला यश मिळते ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच एक गोष्ट म्हणजे यशाच्या शिखरावर पोहचल्यावर आपल्याला मदत करणाऱ्या, यशामध्ये वाटा असणाऱ्या लोकांचे आभार मानणं, नम्र राहणं. समजा, तुम्ही तुमची स्वतःची एक मोठी कंपनी उभी केली असेल. जी की सध्या खूप जास्त तेजीत आहे. भरपूर प्रगती करत आहे आणि तुम्ही त्यामुळे खूप खुश आहात. मात्र हे यश तुमच्या एकट्याचे नाही. ही कंपनी उभी करायला तुम्हाला ज्या लोकांनी पाठबळ दिलं, प्रगती व्हावी म्हणून कामगारांनी घाम गाळून कष्ट केले. कधी कठीण प्रसंग आले तर त्यात साथ दिली त्या सगळ्यांचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे काही नसताना आणि सगळं काही असताना या दोन्ही परिस्थितीत केवळ नम्रच राहायला हवं.

हा विचार कायम आपल्या सोबत ठेवून त्यावर काम करायला हवे. इतकेच काय पण कधी कठीण प्रसंग आले तर स्वतःवर विश्वास ठेवून आपली क्षमता वाढवायला हवी. तसेच वेळोवेळी आलेल्या समस्यांवर मात करून यश मिळवायला हवे. यशाने हुरळून जाऊन किंवा अपयशाने खचून जाऊन तुमची आंतरिक इच्छा, शक्ती कमी होऊ देऊ नका. त्या शक्तीचा योग्य वेळी, योग्य प्रकारे उपयोग करून घ्या आणि आपली प्रगती साधा.

402 

Share


K
Written by
Khusbhu Ghate

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad