Bluepad | Bluepad
Bluepad
सहनशीलता यशाच्या शिखरावर पोहचवते
वंजारी महासंघ महाराष्ट्र
वंजारी महासंघ महाराष्ट्र
23rd Jun, 2022

Share

सहनशीलता यशाच्या शिखरापर्यंत पोहचवते.
अपयशाने खचने नाही खडतर संघर्षाला घाबरणे नाही .संकटांची अनेक शिखरे पार करताना डळमळित न होता सहनशीलता कायम टिकवून ठेवता आली तर मग मात्र यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्या मध्ये काही अडचण येणार नाही.
मनाविरुद्ध घटनाक्रम घडुन सुद्धा न थकता न घाबरता अगदी स्थैर्य पुर्वक सगळ्या घटनांना सामोरे जाण्या मध्ये जर आपण यशस्वी झालो आणि दरम्यानच्या काळात आपल्याला सहनशीलता बाळगता आली तरी नक्कीच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार या मध्ये शंका नाही आपलं यश अपयश हे मुख्यत्वे सहनशीलतेवर अवलंबून असतं . जीवनात
विविध अशा , अपेक्षा , महत्वकांक्षा वझ घेऊन आपण जीवन जगत असतो . आणि या मध्ये काही अपेक्षा महत्त्वाकांक्षा पुर्ण होण्यासाठी आपल्यला खुप खडतर संघर्ष करावा सुद्धा लागतो . अनेका समस्यांना सामोरे जावा लागु शकत. अनेक अडचणी ना सामोरे सुद्धा जावा लागु शकत. आणि या कठिण प्रसंगी सहनशीलता आवश्यक आहे महत्वपूर्ण आहे . आपल्या कडे एक मन सर्व श्रुत आहे पाण्याची सुद्धा चाळणी मध्ये साठवण होऊ शकते . परंतु त्या साठी पाण्याचा बर्फ होई पर्यंत सहनशीलता असेल तरच हे शक्य आहे . आणि सध्याच जग तर प्रचंड उतावीळ आहे . आणि याच उतावीळ पणामुळे अनेक बाबतीत नुकसान सुद्धा होत असतं.सर्वगुणसंपन्न असुनही जवळपास पन्नास ते साठ टक्के लोक आपल्या धेय्य पर्यन्त पोहचत असताना सहनशीलता नसल्यामुळे अति प्रचंड मेहनत करून सुद्धां त्या योग्य परिणामांना गवसणी घालू शकत नाहीत . म्हणजे हाती आलेल यश सुद्धा आवश्यक असणारी सहनशीलता न बाळगल्या मुळ संपुष्टात येऊन पुन्हा शुन्यावर येण्याची स्थिती उद्भवते . आणि या सगळ्या गोष्टींना आपली सहनशीलता कारणीभूत असते .प्रत्येक व्यक्तिच आपल्या जीवनाशी निगडित एक अंतिम धेय्य निश्चित झालेलं असतं हेच अंतिम धेय्य पुर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत असतो . मात्र हे प्रयत्न करत असताना अनेक वेळा कठिण खडतर अशा परस्थिती ला सुद्धा सामोरे जाण्याची वेळ सुद्धा आपल्यावर येऊ शकते .आणि अशा वेळी कामी येते ती सहनशीलता कारण सहनशीलता नसल्या कारणाने जगातील पन्नास ते साठ टक्के लोकांना आपल्या दृष्टीक्षेपात आलेल यश सुद्धा पराभवात अपयशात रूपांतरित होण्यासाठी कारणीभूत असतं. सर्वसाधारण पणे आपण आपल्या आजूबाजूला असणार्या जगाचं अवलोकन केले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येत. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची मनोमन इच्छा आहे . आणि तसे प्रयत्न पण त्या क्षेत्रात चालू असतात. पण मग एवढे सगळं प्रयत्न करून नेमकी अडचण कुठे उद्भवते तर अडचणी हि नसतीच मुळी फक्त त्यासाठी आवश्यक असणारी प्रचंड अशी सहनशीलता आपल्याकडे नसते . आणि याच सहनशीलता मुळ आपण आपल्या जीवनातील अंतिम धेयया पासून वंचित राहतो . आणि नेमकं आपल्या कुठल्याही परिस्थितीत मध्ये यशस्वी होयच असेल तर सहनशीलता हि असलीच पाहिजे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301
सहनशीलता यशाच्या शिखरावर पोहचवते

177 

Share


वंजारी महासंघ महाराष्ट्र
Written by
वंजारी महासंघ महाराष्ट्र

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad