सात जन्माची बांधली होती वरून आपल्या नात्याची गाठ...
तूझ्या माझ्या नात्याची सुरुवात करताना तूझ्या नावाची लागली होती हळद...
सात फेरे घेऊन घेतली होती वचणे..
देवाच्या आणि तुझ्या माझ्या माणसांच्या साक्षीने शेवट मंगलाष्ठके सावधान म्हणून पडल्या होत्या अक्षता...
तुझ्याशी लग्न ठरल्या नंतर सुवासिनी माझ्या हातात तूझ्या नावाचा भरला होता हिरवा चुडा...
रंगली होती तूझ्या नावाची हातावर मेहंदी
तूझ्या नावाचं कुंकू लावलं आणि तुझ्या नावाचे मंगळसूत्र घालून सर्व सूत्र घेतली होती हाती..
लग्न झाल्यावर बदल होतं तस सर्व काही....
तुझ्याशी लग्न झाल्यावर आडनाव आणि वडिलांच्या नावाच्या जागी तुझ नावं आलं...
कुमारीकाच्या जागी सौभाग्यवती लावण्यात आलं..
सत्यनारायण च्या पूजेला बसून पार पाडले होते सत्यनारायण....
सर्वांनी दिलेला आशीर्वाद घेऊन चालू झाली होती आपल्या सुंदर नात्याची सुरुवात...
अशीच साथ राहूदे कायमची अखेरचा श्वासा पर्यंत...