पाऊस पडत होता, हातात चहाचा कप आणि खिडकीतून बाहेर बघत असताना मनात विचार आला......
असं कोणतं पाप माणसाकडून घडलं,
असं कोणतं पाप माणसाकडून घडलं,
कोरोनाने बसवलं घरात,
आणि पुराने बाहेर काढलं।।
मग लक्षात आलं,
मग लक्षात आलं,
हे तर माणसानेच केलं,
निसर्गाने दिलेलं निसर्गानेच नेलं।।
माणसाने सोडली माणुसकीची कास,
टप्प्याटप्प्याने करतोे निसर्गाचा ऱ्हास।।
स्वतःच आवळतोय गळ्याभवती फास,
निसर्गाने इंगा दाखवायला एकच क्षण बास।।
निसर्गाला आहे देवाची साथ,
त्यानेच केली पुन्हा माणसावर मात,
मी मोठा म्हणून काही होत नाही,
प्रगती केली कितीही तरी,
निसर्गाच्या पुढे जाता येत नाही।।
म्हणूनच लोकहो,
थांबवा निसर्गाचा छळ,
निसर्गच देईल संकटातून बाहेर पडण्याचे बळ।।
आता देवाकडे एकच प्रार्थना,
थांबव आता निसर्गाचा कोप,
माणसाला बसला आहे चांगलाच चोप।।
माणूस आता निसर्गमित्र होऊदे,
निसर्गाचे महत्व सर्वांना कळूदे।।
या कवितेच्या रूपातून मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया नक्की वाचा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका... धन्यवाद🙏🙏🙏