हनुमान जयंती🙏🏻
या वर्षी श्रींची यात्रा ,पालखी सोहळा दोन वर्षांनी अनुभवता आला🙏🏻
जसे कोकणातील (कामानिमित्त मुंबईला) चाकरमानी आतुरतेने होळी आणि गणपतीत गावाकडची वाट धरतात त्याच प्रमाणे आम्ही कोकणातील (अलिबागकर) हनुमान जयंती निमित्त गावी जाण्यासाठी उत्सुक असतो....( होळी आणि गणपती ला जातोच) पण आख्या गावाचा आणि माझ्या गावच्या भगवंताच्या सोहळ्यात सहभागी होऊन मनोभावे एकरूप होण्याचा आनंद वेगळाच😊
हा लेख लिहीण्याच कारण- माझ्या प्रत्येक लेखणीत असल्याप्रमाणे आपली संस्कृती आणि जुन्या आठवणींना उजाळा🙏🏻
एकही वर्षी हनुमान जयंती न चुकता हजर राहणारा मी...या वेळी मात्र त्यात दोन वर्ष खंड पडला...
रामनवमी ला मंदिरात सप्ताह (भजन स्वरूपात अखंड सेवा)... सुरू व्हायचा ....सात दिवस खंड न पडता भजन ...लहान असताना बारी मध्ये जाण्यास खुप उत्सुकता असायची .. बहुतेक परिक्षा आटोपलेल्या असायच्या... कोणाच्याही बारीत जाऊन बसायचं...टाळ वाजवायचे....जोरात कोरस ला साथ द्यायची आणि मनोसोक्त बारीवाल्यांसाठी असणारा कोरा चहा प्यायचा...... देवापुढे असणारा साखर खोबऱ्याचा प्रसाद खायचा..... आणि तेव्हा मधुमेह... वगैरे हा प्रकार कधी ऐकलाच नाही..... देवळातील घंटा वाजवणे आणि तीची मित्रांबरोबर स्पर्धा...मग कुणीतरी खडूस आजोबांनी मागे लागावं....😀
हनुमान जयंती थोड्या दिवसांवर आली की आम्ही यात्रेसाठी पैसे जमा करण्यास धडपड करायचो..
मग रोज नित्यक्रम ठरला होता...
आम्ही करज्यांना जायचो ... करजाच जे झाड असतं त्याची करंजी सारखी असणारी फळे गोळा करायचो.... अशी आठवडाभर जमा झालेल्या करज्या मग एका कठीण जागेवर ठेवून फोडल्या जायच्या... त्यातून ज्या बिया निघायच्या त्या जमा केल्या जायच्या....त्यात सुद्धा प्रकार होते.... सुके गोळे, ओळे गोळे ...त्यांचाही भाव (किंमत)वेगळी असायची...
आता प्रश्न की मग हे विकायचं कुठं... तर गावात ते खरेदी करण्यासाठी एक व्यक्ती यायचा त्याला तेली म्हणतं......
बहुतेक तो शनिवार कींवा रविवार हप्त्यातुन एकदाच यायचा..... जसा आपल्याकडे पुर्वी मिठवाला यायचा तसा.... तो त्या बियांच काय करायचा ते अजुन मला कळालं नाही.... बहुदा तो त्याचं कडवं तेल बनवत असावा व ते चांगल्या कींमतीत विक्री करत असावा...असं काही जणं म्हणतं...असो
तर तो ते करज्यांचे गोळे कीलो प्रमाणे खरेदी करायचा...१ रू.किलो..सुके २रू.किलो....
ती आमची हनुमान जयंती साठीची कमाई... रक्कम छोटी असायची पण आनंद खुप मोठा😊....मग त्यात भर आई...बाबा...आणि कोणी पाहुणे आले तर त्यांनी तुला पालखी साठी म्हणुन देलेले पैसे...मग पाहाटे दर्शन झाल्यावर आमची खरेदी सुरू.....
मग पुष्पहार वाजत गाजत निघायचा बुलबुला (बेंन्जो)सोबत....बोरघर-भिलजी-मोरखोल...आणि सर्व गावातील मंदीरात पुष्पहार अर्पण करून आरती करून दुपारी १२...१ पर्यंत मंदिरात परती व्हायची...मग घरातील महीला स्वयंपाक घरात..
एक खुप महत्वाचं म्हणजे त्या वेळी महीलांचा उत्साह वाखाणण्याजोगे होता..
गावातील माहेरकरणी... म्हणजे बोरघर मधील जेव्हढ्या मुली समाज लग्न होऊन उदा. बपल्यात सासरी गेल्या असतील तर त्या सर्व सासरकरणी आपल्या माहेरच्या गावी वर्गणी काढून काही ना काही वस्तू वाजत गाजत आपल्या माहेरच्या मंदिरात आणत असत...
आणि इकडच्या एकाच गावातील माहेरकरणी त्या सुद्धा जात....
अशी प्रत्येक गावात प्रथाच पडली होती.... आणि ती कधी लोप पावली कळलंच नाही...
पालखी मिरवणूक रात्री निघुन हाराप्रमाणेच तीन गाव प्रदक्षिणा घालून मंदिरात पाहटे आगमन होत होती...
कोणाची नजर लागली आणि त्याला गालबोट लागलं....आणि आता फक्त बोरघर पुरत मर्यादित...
त्यावेळी दोन बेन्जो असायचे श्री च्या मिरवणुकीत...एक महिलांसाठी.....एक पुरुषांसाठी.....मोठ्ठी धम्माल💃
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेलं(गावाच्या मालकीचं ) तळं मारणं (म्हणजे तळ्यातिल मासे) ते पकडून त्याचे पुर्ण गावातील घरास वाटा दिला जायचा...... रात्रीच्या गुळाला चे अंग घेऊन तळ्यावर हजर....
पण आता माणुस प्राक्टीकल झालाय... काळानुसार बदलत चाललाय.... ज्या घातक रूढी परंपरा आहेत त्यात बदल होणे आवश्यक पण एकत्रित आणणाऱ्या रूढी परंपरा जोपासणे तितकेच गरजेचे🙏🏻
आज्जी आणि आईच्या वेळेची आठवण 😊
नैनेश म्हात्रे
बोरघर -अलिबाग