Bluepad | Bluepad
Bluepad
पौराणिक महत्त्व असलेले हे आहेत ‘पाच’ प्राणी!
H
Harish V
23rd Jun, 2022

Share

पौराणिक कथांमध्ये प्राण्यांना विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने प्राण्यांची निर्मिती केली तेव्हा त्यांनी त्या प्रत्येकामध्ये एक विशिष्ट रहस्य लपवून ठेवले होते जेणेकरून ते मानवांसाठी त्यांचे आध्यात्मिक महत्त्व सूचित करतील. आज जाणून घेऊयात या प्राण्यांचे पौराणिक महत्त्व.

१) घोडा :

पौराणिक महत्त्व असलेले हे आहेत ‘पाच’ प्राणी!

घोडा हा प्राणी वेगाचे प्रतीक आहे. वेदांमध्ये घोड्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. पौराणिक कथांनुसार, ऋषी कश्यपांची पत्नी सुरभीपासून घोड्याची उत्पत्ती झाली. पुराणानुसार, देवांचे वैद्य अश्विनी कुमारांचे मुख सुद्धा घोड्यांसारखेच होते.
समुद्र मंथनात मिळालेल्या १४ रत्नांमध्ये उच्चै:श्रवा घोडा देवतांना प्राप्त झाला होता. मनाच्या वेगाने धावणारा आणि उडणारा हा शुभ्र घोडा सर्व अश्वांचा राजा मानला जातो.
पुराणात सूर्याच्या रथाला सुद्धा सात घोडे असतात असे सांगितले आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सर्व प्राण्यांमध्ये उच्चै:श्रवा घोड्यास श्रेष्ठ मानले आहे. पौराणिक काळापासून प्रवास आणि युद्धासाठी घोडे मानवास मदत करीत आहेत.
श्रीमद् भागवतानुसार कलीयुगात पाप वाढल्यानंतर विष्णुचा कलीयुगातील अवतार कल्की हा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन धर्माची स्थापना करेल. शालिहोत्र ऋषींनी घोड्यांवर आधारित पहिला ग्रंथ लिहिला. त्याचे नाव ‘शालिहोत्रसंहिता’ असे होते. हा ग्रंथ महाभारत काळाच्या आधी लिहिला गेला असे म्हणतात.

२) कुत्रा :

पौराणिक महत्त्व असलेले हे आहेत ‘पाच’ प्राणी!

कुत्रा हा अत्यंत इमानदार आणि निष्ठावान प्राणी म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की कुत्रे स्वर्ग आणि नरकाच्या दारांचे रक्षण करतात. ते मृत्यूचा स्वामी यम आणि त्याची बहीण यमी यांना देखील सूचित करतात.
कुत्र्यांची देवी सरमाला सर्व कुत्र्यांची आई मानली जाते. महादेवाचे रूप असलेल्या भैरवाचे वाहन कुत्रा आहे. भैरवाला काही प्रतिमांमध्ये कुत्र्याचा चेहरा असल्याचे देखील चित्रित केले आहे.
कुत्रे निष्ठा, आज्ञाधारकता, भक्ती आणि वेदांचे प्रतिनिधित्व करतात. रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणे अशुभ मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे रूप असलेले दत्तात्रेय हे नेहमी कुत्र्यांच्या सहवासात दिसतात.

३) मगर :

पौराणिक महत्त्व असलेले हे आहेत ‘पाच’ प्राणी!

मगर हे वरुण देव, कामदेव, गंगा आणि नर्मदा यांचे वाहन आहे. हिंदू धर्मातील मगर हे देवत्व आणि ब्रह्माचे प्रतीक मानले जाते.
असे म्हणतात की, ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात श्रीहरी विष्णू मगरीच्या रूपात प्रकट होतात.
असेही म्हटले जाते की पूर्वी भारताच्या काही भागात ग्रामीण स्त्रिया संतती प्राप्त व्हावी म्हणून नद्यांच्या काठावर उभ्या असलेल्या मगरींना प्रार्थना करत असत.

४) मांजर :

पौराणिक महत्त्व असलेले हे आहेत ‘पाच’ प्राणी!

एखाद्या श्रीमंत माणसाचे किंवा नेत्याचे सव आदेश पाळणाऱ्या माणसाला ताटाखालचे मांजर म्हटले जाते. चूक माणूस करतो नाव मात्र बिचाऱ्या मांजरीचे येते. खरं तर मांजर ही वाघाची मावशी पण अत्यंत अप्पलपोटी माणसाला मांजर म्हणणे हा त्या प्राण्याचा अपमान आहे. तरीही धर्मग्रंथात सुद्धा मांजरीचा असा नकारात्मकच उल्लेख येतो.
हिंदू ग्रंथात ढोंगीपणा सूचित करण्यासाठी मांजरीचे प्रतीक वापरतात. मनू संहितेत मांजरींचे वर्णन लोभी, लबाड, हानिकारक आणि दांभिक असेच केले आहे. त्यांनी असे सुचवले आहे की अशा लोकांपासून नेहमी दूर आणि सावध राहावे. हिंदू धर्मात मांजरीची पूजा करण्याची प्रथा नाही.
मांजरीला मारणे हे एक गंभीर पाप मानले जाते. मांजरीला मारल्यास मांजरीच्या किमान सात सुवर्ण प्रतिमा तीर्थ क्षेत्री अर्पण करावी असे शास्त्रात सांगितले आहे.
एका घरातून दुसऱ्या घरापर्यंत मांजरीचे पिल्लू घेऊन जाण्याची तुलना एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंतच्या आत्म्याच्या प्रवासाशी केली जाते.
मांजर हे षष्ठी देवीचे वाहन मानले जाते. ह्या देवीची पूजा भारताच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांत केली जाते. देवीच्या प्रतिमेत तिचे वाहन मांजर दाखवलेले असते.

५) बैल :

पौराणिक महत्त्व असलेले हे आहेत ‘पाच’ प्राणी!

बैल हा प्राणी शक्ती आणि बळाचे प्रतीक आहे. वेदांमध्ये बैलाला धर्माचा अवतार मानले आहे. हा साधारण प्राणी जेव्हा रागात येतो तेव्हा तो सिंहावर सुद्धा भारी पडतो. बैलाचे खूप सारे प्रकार आहेत. त्यात नंदी बैल प्रमुख रूप आहे. शिव शंभो शंकराचे वहन सुद्धा नंदी बैलच आहे. ज्यापप्रकारे गायी मध्ये कामधेनू श्रेष्ठ आहे त्याच प्रकारे बैलांमध्ये नंदी श्रेष्ठ आहे. नंदी त्याच्या ज्ञान, भक्ती, आज्ञापालन, सद्गुण आणि महादेव आणि त्याच्या शिवभक्तांच्या समर्पणासाठी ओळखला जातो.
देवांचे रक्षण करण्यासाठी, राक्षसांचा वध करण्यासाठी आणि धर्मासाठी त्याने अनेक लढाया लढल्या.

हिंदू धर्मात बैल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गुणांचे प्रतिनिधित्व करतात. सकारात्मक बाजूने ते पुरुषत्व, पुरुषी शक्ती, लैंगिक पराक्रम आणि लढाऊ भावना दर्शवतात. नकारात्मक बाजूने, ते अंधार, क्रूर शक्ती, अत्याधिक लैंगिकता, वासना, क्रोध, आक्रमकता, आडमुठेपणा, अज्ञान आणि भ्रम यांचे प्रतीक आहेत.
हिंदू धर्मात बैल पोळ्याला बैलांची पूजा करतात आणि त्यांना अन्न अर्पण करतात. बैलाला वृषभ राशीचे प्रतीक मानतात. सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा बैल पूजेचे उल्लेख आढळतात.
पुराणात सर्व प्राण्यांना समान दर्जा मिळत नाही. हत्ती, घोडा, गाय, बैल, डुक्कर, वाघ आणि सिंह हे पवित्र मानले जातात. पण मांजर, गिधाड, कावळा अशा प्राण्यांचे संकेत वाईट मानले जातात. अशा अशुभ मानल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयी अधिक माहिती

वाचण्यासाठी क्लिक करा खालील लिंक वर.
https://www.bluepad.in/article?id=87223
प्रकृतीने प्रत्येक प्राण्याला वेगळे बनवून निसर्ग साखळी तयार केली आहे. त्यामुळे प्राण्यांबद्दल अंधश्रध्दा कधीही बाळगू नये आणि नैतिक बुद्धीने चांगल्या वाईटाचा विचार करावा. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

402 

Share


H
Written by
Harish V

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad