Bluepad | Bluepad
Bluepad
ऑनलाईन गेम्स खेळून स्वप्न पूर्ण नाही होत...
mohini gavas
mohini gavas
23rd Jun, 2022

Share

खर तर हा विषय कसा लिहावा समजतं नाहीय शब्दांची सांगड घालतेय कोणी मला सांगू शकत का कि ऑनलाईन गेम्स खेळून कोणी किती से पैसे कमावलेत, स्वतःची किती सी स्वप्न, पूर्ण केलीयत....
बऱ्याच वेळेला ऑनलाईन मुव्ही पाहताना मध्ये मध्ये येणाऱ्या add पाहत असते,
ऑनलाईन लुडो खेळून 25000 कमावले,
ऑनलाईन रमी सर्कल वर 50000 जिंकले,
मधल्या काही वर्षात कोणता तो गेम नाव नाही आठवत त्याच, तरुण पिढी ला वेड लावल होत त्या गेम ने, मोकळ्या वेळेत टाईमपास म्हणून आलेल्या त्या गेम्स ने आयुष्यातला महत्वाचा असा वेळ घेतला होता...
लोकडाऊन च्या काळात वेळ च वेळ आहे म्हणून, प्रत्येक जण ऑनलाईन गेम्स खेळण्यात मग्न होते बहुतांश लोक...
प्रत्येक ऑनलाईन गेम्स च्या जाहिरात मध्ये लास्ट वेळी एक मेसेज असतो
यह गेम अपने जोखीम पे खेले... इसकी लत लग सकती है, 18 वर्ष आयु के उपर ही अपने रिस्क पर यह गेम खेले...
यात त्यांच्या ही अटी असतात त्या वेगळ्या...
कीव येते यां अशा मुलांची, अन मुलींची ही, ज्या वयात शारीरिक, बौद्धिक मेहनत करायला हवी, त्या वयात तुम्ही ऑनलाईन गेम्स खेळून पैसे कमावण्याची स्वप्न पाहताय...
ज्या वेळी जबाबदारी ची जाणीव होते तेव्हा आयुष्यातील 1 मिनिट ही खूप महत्वपूर्ण ठरतो, स्वतःची स्वप्न, घरच्या जबाबदारी, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, निसटत जाणार वय... हे सर्व जेव्हा समजेल उमजेल न तेव्हा, जाणीव होईल आपण आपला किती वेळ कोणत्या गोष्टीमध्ये घालवला आहे....
कोणावर माझ्या विचारांचं कसलं ही बंधन नाही...
फक्त सावध करणं माझं काम., आता केलेली योग्य मेहनत येणारा भविष्य ठरवतो...
तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय अतीउत्तम, त्यात अजून नावीन्य आणा, त्याच्या जोडीने अजून काही करता येत का, याचा विचार करा, लोकडाऊन च्या काळात अनेक व्यवसायांचं गणित बिनसलं, पण याच लोकडाऊन नंतर अनेक व्यवसाय परत नव्याने सुरु झाले, नवीन नवीन आयडिया वापरात आल्या....
स्वतःच काहीतरी सुरु करतोय ही कल्पना अतिशय उत्कृष्ट वाटते मला, पूर्ण विचाराने, नफा तोटा हे सगळं लक्षात घेत, संयम बाळगत, जीव ओतून केलेली मेहनत.. त्या व्यावसायिक ला यशाच्या शिखरावर नेण्याच काम करत....
यां पोस्ट ने कोणाचं मन दुखावल असेल तर क्षमस्व
MG
Image ( Google )
ऑनलाईन गेम्स खेळून स्वप्न पूर्ण नाही होत...

181 

Share


mohini gavas
Written by
mohini gavas

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad