बास अत्ता खूप झालं,
खूप सोसल तिने,
खूप रंगवल तुम्ही तिला,
खूप आरोप लावले तिच्यावर,
तिचं अस्तित्व बदल तुम्ही,
मालिकेत वेगळीच दाखवली तिला,
ती काही तुमचं खेळण नव्हे.
ती..
साक्षात सर्वगुणसंपन्न लक्ष्मी आहे,
उतम नर्तकी,
उत्तम गायिका,
सरस्वती माता वसली
होती जणू तिच्यात.
ती...
वेळ प्रसंगी जणू महाकाली,
पराक्रमाची शर्थ करता येत होती,
हाती तलवार घेऊन
लढे युद्ध ती मर्दानी,
घुडसवारी प्रिय तिला .
- मिथिला