Bluepad | Bluepad
Bluepad
ओढ प्रेमाची भाग-- 3
Ashok Ingole
Ashok Ingole
23rd Jun, 2022

Share

बांधकाम विभागाची कार सेमिनरी हिल वरील एका आकर्षक बंगली समोर येऊन थांबली .सुभाष ने ऑफिस बॅग घेऊन घरात प्रवेश केला .वंदना धावतच आतून आली .
"काय झाले ?" सुभाष उद्गारला.
"अहो जरा गाडी थांबवा ना" ती धापा टाकत म्हणाली,
" का ?जाऊदे त्याला तो पण घरी जाईल मला सांग काय काम आहे "सुभाश नी बॅग तिच्या हातात दिली.
"नेहाला रानडे कडे जायचे आहे हा सोडून देईल", वंदना म्हणाली.
"इतकच ना मी सोडून देईल जाऊदे त्याला,तो तर गेला पण " हसत सुभाष म्हणाला.
"तुम्ही म्हणजे ना अगदी हरिश्चंद्राचे अवतार आहात, स्वतःच्या कामाकरिता सरकारी गाडी वापरायची नाही ,म्हणजे नाही ,तुमचे दुसरे मित्र बघा " ती रागातच बोलली.
"झालं !आता इथेच थांबा, नाही तर जुना पाढा वाचत बसाल " सुभाष हसत म्हणाला. वंदना वेगाने आत निघून गेली.सुभाष हॉलमध्ये सोफ्यावर बसला.
"नेहा " त्याने हाक मारली ,
"आली बाबा "नेहा हातात पाण्याचा ग्लास घेऊन हजर झाली, ती हसत होती ,आई-वडिलांचे संभाषण तिने ऐकले होते .
"तुला कुठे जायचे आहे ,सांग मी सोडून देतो" सुभाष म्हणाला , "बाबा "! नेहा सुभाष कडे बघून आश्चर्याने म्हणाली" तुम्ही येता?"
"तुम्ही नाही आम्ही दोघे ही येतो" सुभाष पाणी पिऊन म्हणाला , "थोडा वेळ थांब मी फ्रेश होतो" वंदना लगेच आली,
"हे काय आम्ही दोघे म्हणजे मी पण",
" गेला का राग "सुभाष म्हणाला" आम्ही म्हणजे अर्थातच आपण दोघे ,चिरंजीव नाही आहेत ना इथे."?
"हीच तर खंत आहे मला " वंदना उदास झाली.
"ए वंदू "सुभाष उठला "हे बघ निलेश सोबत राहत नाही याचं मला पण दुःख आहे पण आपण त्याला काहीच करू शकत नाही माझ्या मागील झालेल्या सस्पेन्शन चा त्याने इतका धसका घेतला की त्याला नोकरीची चीड येते,"
"बाबा" नेहाने गोष्ट बदललली "रानडे काका कडे काही विशेष आहे का?"
"आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि नेहमीप्रमाणे रानडे मला विसरलेला नाही, त्याने फोनवर मला आमंत्रण दिलेले आहे ", सुभाष आत मध्ये जात म्हणाला.
"नेहा चल तयार हो लवकर " वंदना नेहाकडे बघत म्हणाली "वहिनींना साडी व भाऊजींना काहीतरी प्रेझेंट घ्यावं लागेल " दोघी ही आत गेल्या व तयारीला लागल्या .अर्ध्या तासात दीक्षित कुटुंब आपल्या सेंट्रो कार मध्ये रानडेच्या घराकडे जात होतं .नेहा कार ड्राइव्ह करत होती .सुभाष कौतुकाने मुलीचं ड्रायव्हिंग बघत होता. वंदना मागे बसून होती .बर्डी वरून त्यांनी साडी व प्रेझेंट घेतले .रानडे करिता त्यांनी एक चांदीचा ग्लास घेतला होता . रविनगर चौकातून लेफ्ट टर्न घेत गोकुळ पेठ मध्ये एका टुमदार बंगली समोर नेहाने गाडी थांबवली.दोन वर्षापूर्वीच रानडेंनी हा बंगला घेतला होता.प्रमोद रानडे एक वर्षापूर्वीच मुख्य अभियंता पदावरुन बांधकाम विभागातून रिटायर्ड झाला होता .सुभाष त्याचा जिवलग मित्र होता .कॉलेजपासून दोघांची मैत्री होती .दोघांनी एकाच कॉलेजमधुन बी ई केलं होतं.
प्रमोद चा मुलगा आशिष हा न्यूयॉर्कला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये उच्च पदावर होता व आपल्या पत्नीसह तिथे स्थायिक झाला होता .मुलगी पायल नागपूरलाच मेयोहॉस्पिटल मध्ये जॉईन झाली होती .पायल व नेहा जीवलग मैत्रिणी होत्या.
"या या " प्रमोद स्मित हास्य करत सुभाषचं स्वागत करत म्हणाला नेहा नि कार बंगल्याच्या आवारात पार्क केली .सर्व बंगल्याच्या विस्तीर्ण व आकर्षक हॉलमध्ये आले .श्रीमंतीचे सर्व लक्षण रानडेच्या घरात होते त्यांचे काटोल ला संत्र्याचे बाग होते .व लहान भाऊ शरद सर्व कारभार बघत होता.
"काका" नेहा उद्गारली "पायल दिसत नाही".
" अगं तिचा आत्ताच फोन आला होता ,ती पंधरा-वीस मिनिटात येते " सौ रानडे अर्थात अलका म्हणाली.
"पण काकू आज तरी तिने लवकर यायला हवं होतं",
"बेटा तुम्ही डॉक्टर मंडळी स्वतःला कामात इतके झोकून देता की बाकी सर्व गोष्टींचा तुम्हाला विसर पडतो" प्रमोद म्हणाला ,त्याच्या शब्दात नाराजी झळकत होती ,
"अरे आली असेल एखादी केस त्याची कशाला खंत करून घेतो " सुभाष हसत म्हणाला " आम्ही आलो आहोत ना बरं वहिनी काय प्रोग्राम आहे",
"शेवटी काय तर आपलं कौतुक आपणच करायचं " प्रमोद नाराजीच्या स्वरात म्हणाला, त्याला पायलचं वेळेवर न येणे खटकलं होतं ,
"जाऊ द्या हो एवढे मनाला लावून घेऊ नका " अलका समजावणीच्या सुरात म्हणाली .सुभाष नी विषय बदलून ऑफिसचा विषय काढला व प्रमोदला नवीन सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देऊ लागला ऑफिस म्हणजे प्रमोद चा आवडता विषय होता. अलका व वंदना आत गेल्या .स्वयंपाकीण बाई मेजवानीच्या स्वयंपाकात गर्क होत्या .नेहा टीव्ही ऑन करून आज तक चैनल बघत होती .बाहेर स्कुटी थांबण्याचा आवाज आला तशी नेहा टीव्ही ऑफ करून पोर्चमध्ये पळाली.पायल स्कुटी पार्क करून आत येत होती.
" हे काय ग इतका उशीर? आम्हाला येऊन एक तास झाला सर्व तुझीच वाट बघत आहेत" नेहा म्हणाली.
"सॉरी नेहा एक एमर्जेंसी सिजर ची केस होती ,पण पापा फारच नाराज असतील " हॉलमध्ये बघत पायल म्हणाली.
"नाही ग तसं बाबांनी त्यांना ऑफिसच्या गोष्टींमध्ये गुंतवल आहे नेहाने तिचा हात पकडला .
"काका पण ग्रेटच आहेत त्यांना पप्पांचा विक पॉईंट बरोबर माहित आहे" पायल तिचा हात धरून तिला आत घेऊन आली.प्रमोद समोर येऊन तिने दोन्ही कान धरले .
"पप्पा आय एम व्हेरी सॉरी ,सिजर ची सिरीयस केस होती ", प्रमोद नी तिच्याकडे निरखून बघितले. तिचा सुंदर गुलाबी निष्पाप चेहरा बघून त्याचा राग पूर्णपणे मावळला.
"चलो माफ किया " तो राष्ट्रभाषेत म्हणाला .
"थँक्यू पप्पा ,"पायल हसून म्हणाली .व नेहा सोबत आत गेली .एक छोटासा घरगुती कार्यक्रम या दोन्ही कुटुंबांनी केला. श्री व सौ रानडे यांना सोफ्यावर बसवून वंदना ने ओवाळले दोघांच्या गळ्यात हार घालून व सोबत आणलेला आहेर देऊन सुभाष वंदना ने त्यांना नमस्कार केला. दोन्ही मुलींनी पण त्यांचे अनुकरण केले .मोठ्या डायनिंग टेबलवर जेवणाची ताटं लावण्यात आली इतक्यात एक आर्त स्वर आला-------------
"मम्मी पप्पा मी आलो " सर्वांनी हॉल कडे बघितले ,पायल धावतच हॉलमध्ये गेली .दारात आशिष उभा होता .त्याची अवस्था बघून तिला धक्काच बसला .गोरापान धाड धिप्पाड आशिष बराच रोड झाला होता .त्याची दाढी पण वाढलेली होती व तो हताश वाटत होता.
"दादा " पायल आर्त स्वरात ओरडली "काय झालं?"
आतापर्यंत सर्वच हॉलमध्ये आले होते.आशिष आई-वडिलांकडे बघत होता .अलका धावतच त्याच्या जवळ गेली. त्याला हात धरून तिने आत आणले.
"आशिष तू कधी आला न्यूयार्क करून आणि सपना व शीतल कुठे आहेत?"प्रमोद त्याच्या खांद्यावर हात ठेवून उद्गारला
"पप्पा " आशिषला गहिवरून आले --"सगळं संपलं सपनाने घटस्पोट घेतला आहे .शितल ला घेऊन मी भारतात आलो. तिला बोर्डिंग मध्ये ठेवले आहे",
"काय ?" सर्वच ओरडले.
प्रमोद व अलका त्याच्याकडे बघतच राहिले .सुभाष नि दोघांना बसविले त्याने आशिष ला पण सोप्या वर बसवले .
"हे बघ बेटा आपण सर्व एकाच कुटुंबातले आहोत, विचलित न होता काय घडले ते सर्व सांगून टाक, तू परत आला हे फार छान केलं ," त्याच्या जवळ बसत सुभाष म्हणाला. सर्व निर्विकार नजरेने आशिष कडे बघत होते. नेहाने पायलचा हात धरून तिला वंदना जवळ बसवले.
"दादा काय घडलं ते सांगून टाक " ती म्हणाली.
आशिष ने नेहा कडे बघितले तो किंचित हसला व नंतर त्याने जी हकीकत सांगितली ती ऐकून सर्व स्तब्धच झाले.
""आशिष हा रानडे यांचा एकुलता एक मुलगा अभ्यासात फार हुशार वडील उच्च पदावर होतेच शिक्षणात सर्व सवलती घेत त्यांनी M E सॉफ्टवेअर केले .मुंबईला एका प्रसिद्ध कंपनीत त्याला चांगला जॉब मिळाला .त्याच कंपनीत त्याला एक मित्र मिळाला मनोहर आपटे .हा फार गरीब घरातून पुढे आला होता तो जरी आशिष चा मित्र होता तरी त्याला आशिषचा हेवा वाटायचा . कंपनीतर्फे आशिष ला न्यूयॉर्कमधील ब्रांच मध्ये पाठवण्यात आले होते तेव्हा मनोहर मनातून फारच दुखी झाला होता कारण त्याला हा चान्स घ्यायचा होता .आशिष न्यूयार्क ला गेला.तिथे त्याला सपना गोडबोले ही मराठी मुलगी भेटली व दोघं प्रेमात पडले.सपना चे वडील तिथलेच नागरिक होते व त्यांची सॉफ्टवेअरची कंपनी होती. त्यांना आशिष आवडला त्यांनी लग्नाला संमती दिली. लग्न ठरले रानडे दांपत्य पाहुण्यासारखे लग्नाला न्यूयॉर्कला गेले. वैदिक पद्धतीने लग्न पार पडले रानडे कुटुंब परत नागपूरला आले पण आशिष व सपना कधीच आले नाही .सपना अत्याधुनिक होती व लाडात वाढलेली जिद्दी मुलगी होती .तिची इच्छा नसताना पण आशिष च्या आग्रहामुळे त्यांना एक अपत्य झाले .शीतल ,ती झाल्यापासून आशिष व सपना मनाने दुरावत गेले .सपना पदोपदी त्याचा अपमान करायला लागली. इथेच आशिष ने एक चूक केली तो पूर्वीची कंपनी सोडून गोडबोलेंना जॉईन झाला. गोडबोले हे मुलीचीच बाजू सांभाळणारे होते .त्यामुळे दोघांच्या भांडणात ते पडत नव्हते .आशिषने जुनी कंपनी सोडल्यावर मनोहर आपटे हा न्यूयॉर्कमध्ये त्याच्या जागी जॉईन झाला .मित्र म्हणून आशिष ने मनोहरला घरी आणले व त्याचा सर्वांशी परिचय करून दिला. ही अशिष ची दुसरी चूक ठरली .मनोहर नि सपना शी मैत्री वाढवली तो वारंवार घरी येऊ लागला त्याने सपनाला आशिष बद्दल खोट्या गोष्टी सांगून त्यांचा वाद वाढवून दिला .सपनाच्या प्रेमामुळे आशिषने आई-वडिलांची कधीही संबंध ठेवला नव्हता .सपनाच्या अशा वागण्याने तो मानसिक दृष्टीने खचत गेला तिकडे सपनाचे मनोहर सोबत फिरणे सोबत येणे जाणे बघून त्यानी सपनाला जाब विचारला.तर तिने हसत घटस्फोटाचा सल्ला दिला .मात्र तुझी मुलगी मी ठेवणार नाही या अटीवर. गोडबोलेंनी पण मुलीच्या निर्णयाला पाठिंबा दिला . आशिषने स्वतःची जी काही प्रॉपर्टी होती ती सर्व विकली व मुलीला घेऊन मुंबईला लिहून आला .मुंबईला त्याने एक कंपनी जॉईन केली. शीतल चार वर्षाची असल्यामुळे त्याला ऑफीस व घर हे दोन्ही जमत नव्हतं म्हणून तिला पुण्याला बोर्डिंग मध्ये ठेवले आई वडिलांसमोर जाण्याची हिम्मत होत नव्हती पण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता व त्याला राहवलं गेलो नाही"".
हे सर्व ऐकून क्षणभर शांतता पसरली .अलकाचे व पायल चे डोळे वाहत होते. दुसर्‍याच्या दुःखात सहभागी होणं सोपं असतं .पण स्वतः वर दुःख आलं तरच त्याची जाण होते.
"बेटा माझ्या शितल ला घेऊन ये ,आम्ही सांभाळू तिला आणि तू पण हे सर्व एक वाईट स्वप्न समजून विसरायचा प्रयत्न कर" प्रमोद चा स्वर भारावला होता ,
"खरं पप्पा " किंचित उत्साहाने आशिष म्हणाला,
" हो बेटा " अलका म्हणाली "आम्ही तिला खूप लाडात मोठं करू तिला कोणतीच उणीव भासू देणार नाही ",
"ममा" आशिष ने दोन्ही हात जोडले ,"मला माफ करा ,मी तुम्हाला खूप त्रास दिला पण आता मी माझा मार्ग चुकणार नाही आता शितल हेच माझं स्वप्न असेल " तो म्हणाला ,
"बेटा आता शांत हो मागचं सर्व विसरायला हवं त्या लहान जीवाला लवकर घरी घेऊन ये " प्रमोद म्हणाला ,
"हो पप्पा ,मी उद्या पुण्याला जातो तिला घ्यायला" आनंदी स्वरात आशिष म्हणाला.
"चला आता जेवायला अन्न गार होत आहे" नेहाने सर्वांना आत नेले,स्वतःच्या घरी परतल्यावर आशिषला फार बरे वाटले . जीवनातील या नवीन वाटेवर त्याला आई वडिलांची साथ मिळणार होती .मुलगा परत आल्यामुळे रानडे कुटुंब आनंदित होते.
आनंदात व गप्पागोष्टी करत रात्रीचा सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला .रात्री दहा वाजता दीक्षित कुटुंब आपल्या घरी परतले.
--------------*---------------------------*---------------
(क्रमशः) ओढ प्रेमाची भाग-3 पूर्ण

177 

Share


Ashok Ingole
Written by
Ashok Ingole

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad