Bluepad | Bluepad
Bluepad
पूर - गावातला आणि डोळ्यातला!
कु. जान्हवी विद्याधर दाबके
कु. जान्हवी विद्याधर दाबके
23rd Jun, 2022

Share

पुरात सापडलेल्या एका मुलीने माझ्याशी व्यक्त केलेलं मनोगत -( काव्यरुपात)
आभाळ भरून आलं ग,
होत्याचं नव्हतं झालं ग !
कालचं हसतं - खेळतं गाव
आज वाहून गेलं ग !
पूर नुसता गावात नाही
डोळ्यातसुद्धा भरून आला,
माय बाप जिवलग सारे
डोळ्यासमोर घेऊन गेला.
लाडके ढवळ्या पवळ्याही
ओरडत ओरडत वाहून गेले,
कपिलाही गेली आणि दावं फक्त राहिले.
नदीबाई पाहुणी नाही तर
काळ होऊन आली,
प्रसाद म्हणून डोळ्यात
फक्त पाणी ठेवून गेली.
पूर काय गेला निघून
गावकरीही सावरत आहेत,
पण त्या काळरात्रीचे
क्षण आजही थरकाप उडवत आहेत.
जेवण - दप्तर काही नको
सगळं काही मिळत आहे,
मनगटाला बळ मिळवून द्या
त्याचीच फक्त कमी आहे.
कु. जान्हवी विद्याधर दाबके
पूर - गावातला आणि डोळ्यातला!

173 

Share


कु. जान्हवी विद्याधर दाबके
Written by
कु. जान्हवी विद्याधर दाबके

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad