Bluepad | Bluepad
Bluepad
अन् पाववडे आम्हाला महागात पडले...
JITENDRA DIVE
JITENDRA DIVE
23rd Jun, 2022

Share

आम्ही लहान असतांनाची एक गमतीदार गोष्ट...
त्यावेळी सरकारी हॉस्पीटल काॅलनीत रहात होतो, आम्ही पाचसहा मित्र दुपारची वेळ होती, संजु वारे नावाचा मित्र होता, फार अतरंगी होता तो.
त्याच्या घरचे त्या दिवशी कुठंतरी बाहेर गावी गेले होते, राजु नावाच्या मित्राच्या डोक्यात एक आयडिया आली, संजुच्या घरी पाव वडे करायचे अन मजा करायची असे ठरले.
आता गम्मत अशी की आम्ही सर्व मित्रांनी थोडे थोडे पैसे जमवले त्यातुन ब्रेड चे दोन भले मोठे पुडे आणले.
बाकी सर्व मटेरियल संजुच्या घरी होते...
आमच्या मधे राजु मोठा होता त्याला थोडाफार स्वयंपाकाचा अनुभव असल्याने तो पाववडे करतो असे सांगीतले.
स्टोव्ह पेटवला कढई ठेवली त्यात अर्धा एक किलो तेल संजुच्याच घरातील वापरले, बेसन पिठ सुद्धा संजुचेच.
दोन पुडे ब्रेड चे असल्याने पाववडे भरपुर तयार झाले,त्या सोबत हिरव्या मिरच्या पण राजुने तळल्या,आता आम्ही सर्व मांड्या घालुन बसलो प्रत्येकाने मनसोक्त पाववडे खाल्ले दुपारची वेळ असल्याने सर्व पाववड्यांवर तुटुन पडली.
पोटभर वडे खाऊन झाल्यावर संजुच्या लक्षात आले की सारं काही आपलंच मटेरियल होतं तेल, बेसन, मिरच्या, स्टोव्ह सुद्धा आपलाच? अन् ह्या पोरांनी ब्रेडशिवाय काहीच आणलेलं नव्हतं म्हणजे आपल्यालाच भुर्दंड झाला की?
बालीश बुद्धि असल्याने संजु रडायला लागला, आम्ही त्याची समजुत घालु लागलो पण काही केल्या संजु ऐकेना.
शेवटी शेवटी त्याने मातीत लोळवन घेतली सारी माती डोक्यात हाताने भरुन मोठमोठ्याने रडु लागला, माझी आई मला आल्यावर एवढे तेल, बेसन कुठं गेले? विचारीन अन् मला मारीन असा ओरडुन मातीत गडबडा लोळत राहीला.
आता काय करायचे हा आमच्या पुढे पेच पडला, मी एक आयडिया लढवली अन बोललो आपण सर्वांनी कंट्रिब्युशन काढुन संजुला तेल अन् बेसन पिठ आणुन द्यायचे म्हणजे तो रडायचे थांबवेन अन् काही घडलेच नाही, असे त्याच्या आई वडीलांना कळणारच नाही.
आम्ही तसेच केले तेल, बेसन आणुन जेथल्या तेथे ठेवुन भांडी कढई,डिशा,झाऱ्या सारं काही घासुन पुसुन ठेवुन दिलं.झाडं-झुड केली तेंव्हा संजु रडायचा थांबला.
आम्ही घराबाहेर पडुन पोट धरुनधरून हसत सुटलो..
आजही आठवण आली की तो संजुचा किस्सा आठवतो, आख्खे घर त्याने कसे डोक्यावर घेतले होते अन् आख्खी माती कशी स्वतःच्याच डोक्यात टाकुन लोळत होता,सारं काही आठवले.
पुनः आम्ही असा प्रयोग संजु कडे कधीच केला नाही.
मित्रांनो मग कसा काय वाटला आमचा किस्सा?
लेखक -जितेंद्र दिवे
8390526444

244 

Share


JITENDRA DIVE
Written by
JITENDRA DIVE

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad