Bluepad | Bluepad
Bluepad
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
अनिता नितीन गायकवाड
अनिता नितीन गायकवाड
23rd Jun, 2022

Share

निसर्ग देवतेचे आपल्या वर अनंत उपकार आहेत . निसर्ग आपल्याला मिळालेलं वरदान .पण कधी कधी मनूष्याच्या अतिक्रमणामुळे निसर्ग कोपतो.आणि माग र्रौद्र रूप धारण करतो.निसर्गाचा प्रकोप झाल्यास त्याला थांबवणे कोणाच्या हातात नसते.निसर्गाचा समतोल बिघडला की मग वादळे, अतिवृष्टी, महापूर,ढगफूटी यांसारखे महाप्रलय ,संकटे येतात आणि मोठ्या प्रमाणात जीवहानी, वित्तहानी घडून येते.
कधी कधी अतिवृष्टी झाल्याने, ढगफूटी झाल्याने, तापमानात वाढ झाल्याने बर्फाच्छादित प्रदेश वितळतात.आणि नद्या तूंडब भरतात.तसेच मानवनिर्मित कचरा ,गाळ नद्यांच्या पात्रात साठल्याने नद्या ओथळ होवून जातात आणि मग नदी किनारा तोडून नद्या वाहू लागतात.आणि महापुराचे संकट ओढावते.महापूराचे पाणी वेगाने कोणत्याही दिशेला प्रवाह सोडून वाहू लागते. आणि पात्रांचे मोठं मोठे लोंढे वाहु लागतात.या पाण्याची पातळी इतकी उंच असते की मोठं मोठी झाडे त्याच्या प्रवाहात टिकाव धरत नाही.पाणी आजूबाजूच्या परिसरात घरा घरात पाणी शिरते.गूरे,ढोरे,पशू पक्षी,घरेच्या घरे सगळं ह्या गंगामाई च्या पोटात सामावून जातात वाहून जातात.आणि जो पर्यंत पाण्याची पातळी कमी होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही पूर थांबवू शकत नाही ‌
पूराच्या ओघात अन्न धान्य,घरे दारे, शेते वाहून जातात आणि संसाराच्या संसार उद्धवस्त होतात.मोठया प्रमाणात विध्वंस घडून येतो.निसर्गाचे प्रलयंकारी भयंकर रुप मोठ्या प्रमाणात नूकसान करून जाते.क्षणार्धात होत्याच नव्हतं घडते.कितीतरी संसार उद्धवस्त होतात ‌आणि किती कूंटूबे विखरून जातात.पूराच्या संकटातून सावरणं कठीण होऊन जाते.मोडलेला संसार पून्हा सूरु करायला वेळ लागतो ‌.किती कूटूबाच्या डोळ्यांत निसर्गाच्या संकटामुळे पूर दाटून येतो.
निसर्गाचा प्रकोप थांबवण्यासाठी आपण निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून उपाय करायला हवे.वृक्षलागवड केल्यास तापमान कमी होवून बर्फाळ प्रदेश वितळणे थांबून नदी पात्रे तूंडूब भरणार नाहीत,तसेच नद्यांच्या पात्रात कचरा टाकण्यास बंदी करावी.नदीपात्रातील गाळ वेळोवेळी स्वच्छ करायला हवा.या उपायांमुळे महापूर येण्यास प्रतिबंध होईल.महापूरामूळे झालेले नूकसान भरुन काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मदतीचे हात पूढे केले पाहिजे.महापूरात सापडलेल्या लोकांना आपण धीर दिला पाहिजे.पू्न्हा धैर्याने उभे राहण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
गंगामाई ही पाहूण्या सारखी दोन दिवस येते आणि माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचते आणि सर्व काही घेवून जाते.म्हणजे महापूर दोन दिवस येतो आणि सगळं काही उद्धवस्त करून जातो.पण या संकटाचा सामना करायला आपण न डगमगता पून्हा धैर्याने उभे राहिले पाहिजे.संसार मोडला तरी कणा मोडू न देता लढायला शिकलं पाहिजे.
कवी कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कणा कवितेतून पूरात सापडलेल्या व्यक्तिला पून्हा उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.आपल्या जीवनात आलेल्या संकटाना, वादळांना,महापूराना न घाबरता त्यांचा धैर्याने सामना करायला हवा.निसर्गाच्या प्रकोपला थांबवण्यासाठी त्याचे नियम पाळायला हवेत आणि नैसर्गिक संकटाचा ही धैर्याने सामना करायला हवा.त्यातून बाहेर पडून पून्हा नवीन सुरूवात करायला हवी.कवी हरिवंशराय यांच्या निड का निर्माण फिर फिर या कवितेतून पून्हा उभे राहून आपण नवनिर्मिती करायला शिकलं पाहिजे.
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

368 

Share


अनिता नितीन गायकवाड
Written by
अनिता नितीन गायकवाड

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad