Bluepad | Bluepad
Bluepad
भयंकर पूर
लियाकत रफीक शेख
लियाकत रफीक शेख
23rd Jun, 2022

Share

सत्य घटना वरुर (धाकटी पंढरी) ता. शेवगाव जि. अहमदनगर येथील ३१ ऑगस्ट २०२१ पहाटेची वेळ आणि अचानक मागच्या गावातून नदीतून पाणी जोरात आले काही गावांमध्ये ढगफुटी झाली आणि पहाटे पाच च्या सुमारास गावात पाणी येण्यास सुरुवात झाली. नदी तुडुंब भरून पाणी गावच्या दिशेने निघाले नदी शेजारी असणार्‍या वस्तीवर लवकर पाणी गेले. काही लोक झोपेत होते. ज्यांनी बाहेर पाणी पाहिले त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्या वस्ती वरील लोकांना गावात किंवा दुसरीकडे जाण्याचा काहीही मार्ग नव्हता कारण दोन्ही बाजूने नदी होती. वस्तीवर फक्त एकच स्लॅब चे घर त्यावर कशे तरी लोक जाऊन उभा राहिले. लहान लहान बाळांना कंबरेला बांधुन दोरीच्या सहाय्याने वर चढावे लागले कित्येक जणांना जखमा झाल्या. आणि १५ मिनिटात सर्व पाणी त्या वस्तीच्या घरात कमरे च्या वर लागेल इतके पाणी झाले.
भयंकर पूर
दोन दिवसापासुन तिकडे लाइट नव्हती म्हणुन लोकांच्या मोबाईल चार्जिंग सुद्धा नव्हती. त्यामुळे गावात आणि दुसर्‍या वस्तीवर कुणालाच अंदाज नव्हता एवढे पाणी येईल. सगळे लोक झोपेत होते. आणि ठीक सहा वाजता पूर्ण गावात पाणीच पाणी झाले भयंकर परिस्थिती झाली. सगळे झोपेतून उठलेले कुठे पळावे काहीच कळेना, जो तो आपापले लहान मुले आणि पैसे वैगेरे घेऊन घराच्या छतावर गेले. गाव सोडून जायला काहीच पर्याय नव्हता कारण चारही बाजूने नदीच होती आणि आजूबाजूच्या गावातीही अशीच भयंकर परिस्तिथी झाली. सगळे आपापल्या परीने प्रयत्न करून जिकडे उंच जागा आहे तिकडे गेले. अक्षरशः पत्राच्या खोलीवर लोक उभे होते. सगळ्यांच्या घरात छातीला लागेल किंवा ५ ते ७ फुट उंच घरात पाणी शिरले होते. पूर्ण घरात पाणीच पाणी साचेल त्यामुळे काही लोकांनी आपले दार उघडे ठेवून तिथून निघून गेले. आणि मग सर्व घरातील साहित्य जे असेल सर्व च्या सर्व पाण्याने भिजून गेले खराब गेले. महत्त्वाचे कागदपत्रे, काहींचे पैसे, अन्नधान्य, भांडे सर्व काही खराब होऊन नासधूस होऊन वाहून गेले होते. आणि शेवटी नदीच्या दुसऱ्या कडेला भरपूर चढ आहे तिकडे पाणी जाण्याची शक्यता नव्हती. तिकडेही काहीच मिनिटात पाणी घुसले. आणि गावात जी परिस्तिथी झाली तशीच इकडेही झाली इकडे जास्तीत जास्त ४०० मिटर पर्यंत पाणी आले होते. खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ही बातमी वेगाने पसरली दुसऱ्या गावातील लोक पाहण्यासाठी येत होते. दुपारी दोन च्या सुमारास रेस्क्यू टीम त्या ठिकाण आली. दोन बोटी त्यांच्या होत्या. आणि पहिले ज्या वस्तीवर पाणी गेले त्यांना घेऊन आले.
भयंकर पूर
भयंकर पूर
तोपर्यंत पर्यंत गावात सगळी नासधूस झाली होती. मनुष्यहानी एकही झाली नाही. 6 च्या सुमारास पाणी कमी होण्यास सुरवात झाली. एकाच्याही घरी दिवसभर चूल पेटली नाही. कोणीही चहा सुद्धा घेतलेला नव्हता. आणि रात्री घरातील पाणी कमी झाले पण सर्व अन्नधान्याचे नुकसान झाले होते स्वयंपाक करण्यासाठी काही शिल्लक नव्हते. खूप भयंकर परिस्थिती होती. मीही त्या ठिकाणी होतो. माझ्या मामाचे गाव आहे, रोज येणे जाणे आहे. तिथे त्या दिवशी मी मुक्कामी होतो. सगळी परिस्थिती मी पाहिली होती. सकाळी दहा वाजता पाणी गावांत ७ ते ८ फुट उंचीवर होते.
भयंकर पूर
आणि त्या त्यावेळी गावातील ७० टक्के प्राणी मरण पावले होते. त्यात शेळ्या, म्हशी, गाई, कुत्रे, मांजर, बैल, कोंबड्या मृत्यूमुखी पडले होते. खूप खूप वाईट वाटतं होत. काही पाण्यात वाहताना दिसतात होते. ज्या प्राण्यांनी ओढून ताणून दोरे तोडले ते वाहून गेले. खूप म्हणजे खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वाहणार्‍या पाण्यात जनावरे, साप, वैरण, गाड्या आणि एक टेम्पो उलटून वाहून जात होता. खूप जवळून दृश्य पाहिले. काहीच खर वाटतं नव्हतं फक्त आश्चर्य वाटायचं पण सत्य परिस्थिती होती. सकाळी ७:३० ला मामाच्या घराच्या शेजारी म्हणजे ५० मीटर अंतरावर आम्ही हे सगळ पाहत होतो आणि तिथून १०० मीटर अंतरावर नदी आहे. टेकाड असल्यामुळे पाणी मंद गतीने वाढत होते. आणि ५ मिनिटात इतके वाढले की आमची जिथे उभे होतो तिथे कमरेला लागले एवढे पाणी झाले. आणि तेथील एक पूर्ण कुटुंब त्यांच्या घराच्या छतावर होते.
भयंकर पूर
त्यांना बाहेर काढण्याची धावपळ सुरू झाली ज्यांची ज्यांची जास्त उंची होती ते पाण्यात उतरले मलाही घेऊन गेले. आम्ही त्या पाण्यातून ३० मीटर अंतरावर चालत गेलो खूप भीती वाटत होती. कसे बसे गेले लहान मुलांना खांद्यावर घेऊन आम्ही तीन जण पुढे आलो. तिथे एक आजोबा होते त्यांना दोन जणांनी उचलून आणले. आणि मग आम्ही पुढे उंचीच्या ठिकाणी जाऊन उभे राहिलो... खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. आरडाओरडा आणि आक्रोश सगळ्या गावात सुरू होता. नदीच्या शेजारी असलेले शेत अर्धे अर्धे वाहून गेले. त्यात आमचेही शेत होते. रात्री उशिरा पाणी कमी झाले सगळ्यांच्या घरात गाळ, सगळ्या रस्त्यावर गाळ चालता सुद्धा येत नव्हते पाय सटकत होते. कुणीही दिवसभर जेवलेले नव्हते चहा सुद्धा नव्हता. भुका तर सगळ्याना होत्या पण पर्याय काहीही नव्हता थेट दुसर्‍या दिवशी सकाळी दुसर्‍या वस्तीवरून गावातून लोक भाजी पोळी घेऊन आले मग गावात वाटप करण्यात आले...... खूप भयंकर परिस्थिती होती. न भूतो न भविष्यति........
भयंकर पूर

181 

Share


लियाकत रफीक शेख
Written by
लियाकत रफीक शेख

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad