Bluepad | Bluepad
Bluepad
*शब्द चिंतन*
Vijay Dawange
Vijay Dawange
23rd Jun, 2022

Share

*शब्द चिंतन*
*प्रार्थना*
*कराग्रे वसते लक्ष्मी |*
*करमुले सरस्वती ||*
*करमध्ये तु गोविंदा |*
*प्रभाते कर दर्शनम ||*
म्हणूनच आपल्या करा मध्ये, म्हणजेच हता मध्ये आपल्या आराध्यदैवतेचा वास्तव्य आहे. त्यामुळे रोज सकाळी आपल्या हाता कडे बघून म्हटले पाहिजे
*माझ्या हाता मध्ये कुठलीही गोष्ट बणविण्याची, चालवण्याची अथवा दुरुस्त करण्याची ताकद आहे. त्या ताकदीच्या आधारे, मी संपूर्ण जगाला चालवु शकतो, त्या साठी रोज सकाळी मी माझ्या हाता कडे बघून, आपल्या शक्तिची कल्पना करतो*
वरील प्रार्थना दररोज करुन, जो परमपिता परमात्म्याचा अशं आत्म्याच्या स्वरूपात, आपल्या मध्ये वास करतो. त्याला सुद्धा स्मरण करून, त्याला या प्रार्थनेच्या माध्यमातून जागृत करून, जो आत्मविश्वास निर्माण होतो. त्या मधुनच जी सकारात्मक उर्जा निर्माण होते, ती उर्जितावस्था आपल्या आत्म्याला, त्या परमात्म्याच्या सोबत जोडुन, आपन केलेल्या प्रार्थनेला इश्वरा प्रती समर्पित करण्याचे कार्य करते. व त्या मधुनच निर्माण होणाऱ्या भक्तिभावाने जे सकारात्मक बदलाव आपल्या आयुष्यात घडवून येतात, तेच आपल्या त्या मनपूर्वक केलेल्या प्रार्थनेचे फलित असते. म्हणून कुठल्याही आराध्यदैवतेच्या प्रार्थना करण्या पुर्वी, आपल्या स्वतःच्या आत्मविश्वास जागृत होणे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून *पावर आॅफ स्पोकन वर्ड* च्या सिद्धांतानुसार आपल्या मेंदू मध्ये निर्माण होणाऱ्या व बोलण्यातून बाहेर पडणाऱ्या *प्रत्येक शब्दा मध्ये अमर्याद ताकद असते* व त्याच सकारात्मक शब्दां मुळेच आपल्या हातुन अमर्याद व अकल्पनीय गोष्टी घडतात. कारण तो स्मरण केलेल्या शब्दातून आपल्या आत्म्याला एकप्रकारची प्रार्थनाच असते व ती सरळ त्याच्या सोबत जोडलेल्या परमात्म्याच्या पर्यंत पोहोचली जाते. व त्या मधुनच आपल्याला मनोवांछित परिणाम दिसून येतो. त्याच बरोबर आपल्या डोक्यात निर्माण होणाऱ्या स्वतःच्या बाबतीत अथवा दुसऱ्या बद्दल नकारात्मक विचारांचे शब्द, हे नकारात्मक प्रार्थना बणुन आत्मा व परमात्मा यांच्या नकारात्मक उर्जेची निर्मिती होऊन, आपल्या आयुष्यात नकारात्मक बदलाव घडवून येण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून जुने लोक म्हणतात *जसे जे पेरले तसेच ते उगवणार* म्हणून सकारात्मक विचारांनी केलेली प्रार्थना, आपले मनस्वस्थ ठेवून आपल्या प्रगतीचे दालने उघडून देईल....
सुप्रभात 🛐

230 

Share


Vijay Dawange
Written by
Vijay Dawange

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad