महाराज आज मला अचानक भेटले आणि गालातल्या गालात हसले,मला थोडे नवलच वाटले आणि हळूच मी आपले मनातच म्हटले महाराज का बरे हसले,ते तर साक्षात अंतर्यामी त्यांनी लगेच माझ्या मनीचे जाणले आणि म्हणाले,अरे माझा हरी आज पुण्य नगरीत अवतरला म्हणून आज मेळा वारकऱ्यांचा जमला. टाळ,चिपळ्या, मृदंगगाचा नाद घुमू लागला आणि सारा ब्रम्हांड डोलू लागला आणि म्हणूनच मी हसू लागलो. आणि मेळ्यात सोबतीला ज्ञानाचा आणि तुकारामाचा ही जयघोष होऊ लागला वा भावार्थदीपिका कानी गुणगुणू लागली. सारे वारकरी फेर धरू लागले. आणि विठ्ठल मध्ये विठेवर उभा राहून डोलू लागला. आणि जन्म- मृत्यू येरजारे फेर्यातून सोडवू लागला.
प्रीती लांडगे.