Bluepad | Bluepad
Bluepad
गुरुघंटाल
Milind Joshi
Milind Joshi
23rd Jun, 2022

Share

‘काय बोलावे’ हे शिकण्यापेक्षा ‘काय बोलू नये’ हे शिकावे. मला तर वाटते, हा विषय पाचवीपासून दहावी पर्यंत अभ्यासक्रमातच सामील असावा. याचा योग्य सराव केला तर अनेक नाती वाचतील. अनेक युती नव्याने बनतील आणि अनेक लोकांना होत असलेला त्रास बंद होईल.

हे सगळे मला कधी समजले? ज्यावेळी ‘जे बोलू नये’ ते मी चारचौघात बोललो त्यावेळी. काही गोष्टी माणूस अनुभवातूनच शिकतो. ही गोष्टही त्यातलीच...

गुरुघंटाल

त्यामुळे बोला, मनात येईल ते बिनधास्त बोला... एक वेळ नक्कीच अशी येईल, ‘काय बोलू नये’ हे तुम्हालाही समजेल, आणि तेच कायमस्वरूपी लक्षात राहील.

आता काही लोक असेही असतात की इतके सगळे होऊनही त्यांना कधीच समजत नाही, ‘काय बोलू नये’ त्यांना कायम अशा वक्तव्यांचा ‘फटका’ बसतो. त्याबद्दल जास्त विचार करू नका. देवाने त्यांना ‘ठेचकाळण्यासाठीच’ पृथ्वीवर पाठवले आहे. ते जे बोलतात त्यात त्यांचा काहीही स्वार्थ नसतो. असतो तो फक्त परमार्थ. तसेच त्यांच्या अनुभवातून लोकांनी धडा घ्यावा यासाठीची त्यांची तळमळ. हेहेहे...

-- गुरुघंटाल नाशिककर, मिलिंद जोशी...

220 

Share


Milind Joshi
Written by
Milind Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad