आपल्या देशात तीन ऋतू म्हणजे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा....पावसाळा हा निसर्गाला एक वरदान देणारा ऋतू....सगळी सृष्टी जणू काही न्हाऊन निघते ...
निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो....हिरवागार शालू नेसून धरती सजलेली दिसते ...दृष्टी जाईल तिकडे सृष्टी हिरवीगार दिसते.....
पाऊस तसा सर्वानाच भावतो.... तन मन चिंब करून जातो...जलधारा नी मन सुखावतं....पण हाच पाऊस वाजवी पेक्षा अधिक प्रमाणात झाला तर.....
तर मात्र सगळं काही उध्वस्त करून जातो..... घरंच काय पण गावंच्या गावं वाहून जातात....हा पाण्याचा प्रवाह आपल्या सोबत सगळं काही घेवून जातो आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं होऊन जातं....
पूर येणं ही एक नैसर्गिक घटना असली तरी त्यासाठी मानव देखील कारणीभूत आहेच...विकासाच्या नावाखाली या धरतीवर जो काही अत्याचार वर्षानुवर्षे चालत आलेला आहे त्याचे परिणाम म्हणजे महापूर,भूकंप, अवर्षण,वादळ हे आहेत....
निसर्ग सुंदर आहे,अफाट आहे आणि दयाळू देखील आहे पण तोच क्रूर देखील आहे....निसर्गाला जपले नाही तर तो आपले रौद्र रूप दाखवतो....आणि मग मानव त्यालाच दोषी मानतो...
नद्या ,नाले ,सरोवरे ,समुद्र यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली ही सभोवतालचा परिसर जलमय होतो...यालाच पूर म्हणतात...नद्यांना अनेक कारणांनी पूर येतो...
अतिवृष्टीमुळे, कधी धरण फुटल्याने,चक्री वादळ आल्याने, हिमाच्छादित प्रदेशात बर्फ वितळल्याने,सागराला भरती येते तेव्हा....पूर परिस्थिती निर्माण होते...संपूर्ण परिसर जलमय होतो...
पूर आल्याने सगळा परिसर उध्वस्त होतो...जीव हानी ,वित्त हानी देखील होते ...या महापुराच्या संकटातून सावरायला बराच अवधी लागतो ....
पूर येण्यासाठी मानव निर्मित कारणे देखील आहेच...पर्यावरणाचे संतुलन, वृक्ष तोड,विकासाच्या नावाखाली जमिनीवर झालेले अत्याचार, नद्या तलाव सागर यावर केलेले अतिक्रमण,कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि मानवाची निसर्गाप्रती उदासीनता आहे...
पूर आल्याने वन्य जीव,पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते.कार्यालये,घरे ,बँका,कोठारे या ठिकाणी पाणी शिरल्याने अन्नधान्य ,आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते...
रस्ते , गावं वाहून जातात ...सगळ्यांशी संपर्क तुटतो....सगळी घडी विस्कटून जाते ..पुन्हा नव्याने सर्व उभे करण्यात प्रचंड पैसा आणि कष्ट लागतातच ..
सर्व सामान्य लोकांना सुख सुविधा देणारे वीज,पाणी दूरध्वनी सेवा विस्कळित होते ..रोगराई पसरण्याची शक्यता वाढते....नव्या व्याधींचा सामना करावा लागतो....
पूर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.....विनाश करणारे संकट आहे...तरी देखील पाण्याचे नियोजन,कचऱ्याचे व्यवस्थापन केले तर याचे परिणाम कमी करता येईल...
वास्तविक नैसर्गिक संकटामुळे निसर्गाशी कसे जुळवून घ्यायचे हे शिकता येते...पुरामुळे सगळीकडे हाहाकार निर्माण होतो पण जागरूक राहणे हेच आपल्या हाती आहे...
पुराचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना सूचना देणे ,सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे,निवारा,खाण्या पिण्याच्या सोयी करणे,त्यांना आधार देणे,शासनाने आणि स्वयं सेवी संस्थांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत करणे अपेक्षित आहे...
संकटातून पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी तयार असणे हे देखील आवश्यक आहे....
संगीता वाईकर.नागपूर...