Bluepad | Bluepad
Bluepad
प्रश्नांचे बाण
विनय नारायण
विनय नारायण
23rd Jun, 2022

Share

तू मॉर्निंग वॉकला जातोस की टॉकला जातोस..???
माझं एक पाऊल घरात पडल्या पडल्या किचनची भिंत भेदून एक प्रश्न माझ्यावर येऊन आदळला...
वाजले किती ..घड्याळ बघ...दुसरा बाण मागोमाग येऊन थडकला.
मी शांत राहिलो..घरातच ठेवून दिलेला मोबाईल चेक करून कुणाचा मिस कॉल नाही ना हे पाहून घेतलं. दोन ग्लास पाणी प्यायलो..तिला हाय केलं..टॉवेल घेतला आणि सरळ आंघोळीला गेलो..
आंघोळ आटपून वॉशरुम मधून बाहेर येईपर्यंत बाईसाहेबांच्या इतर प्रश्नांचे बाण त्या दरवाजाने थोपवले होते आणि किचनमधलं गरम वातावरण एक्झॉस्ट फॅन चालू असल्याने कमीही झालं होतं..
काय रे तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला काय होतं..?
मी फ्रेश हसलो.. ती सुद्धा हसली..
काही प्रश्न ऑप्शनला टाकायची माझी सवय शाळेपासूनची आहे ....ती आजही तशीच आहे .
विनय नारायण
२३ जून २०२२

238 

Share


विनय नारायण
Written by
विनय नारायण

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad