Bluepad | Bluepad
Bluepad
पूर हा पुरच असतो...
शशिकांत हरिसंगम
शशिकांत हरिसंगम
23rd Jun, 2022

Share

पूर हा पुरच असतो
तो थोडाच सांगून येतो.
येतो तेव्हा अंगावर्ती उसळून येतो.
संसार सारा....डोकीवर
हाच पूर घ्यायाला लावतो..
लहान मोठे गिळून टाकतो.
किडूक मिडूक तर कुठे मागे ठेवतो.?
उभे असते घर गावात
त्याची तो दगड माती करतो.
मनामध्ये दाटल्या वेदना
पूर ठसठसून टाकतो.
पाण्यामध्ये भिजते जगणे
डोळ्या मधून डाटून येते
घरात चिखल भावनांचा
आयुष्य सारे राड करतो
घरापुढल्या जीवनामध्ये
नोटाचा चिखल होतो
आसवाची जमून गर्दी
गालावरून ओघळून नेतो.
शिवार पाण्याखाली जाते
होत्याचे नव्हते होते.
झोपडील्या भांड्यातले दूध
पाणी त्याचे होऊन जाते.
खूण्टा जात्याचा निसटून येतो
उदास मनाला सवाल पडतो.
फिरवावे ते जाते कैसे ?
पीठ पडावे त्यातून कैसे ?
पूर हा पुरच असतो...
गुडघाभरच्या पाण्यामध्ये
बुडून जाती कर्ते पाय.
सावरून स्वतःला जगणे आता
उरला नाहीं तरणोपाय
.... शशिकांत हरिसंगम , वालचंदनगर.

180 

Share


शशिकांत हरिसंगम
Written by
शशिकांत हरिसंगम

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad