#फेसबुकची_मैत्री
**************
आमच्या वेळी कॉलेजमध्ये एक कॉलेजक्वीन होती.
प्रत्येकजण तिनं किमान एकवेळ आपल्याकडे पाहावं इतकी माफक अपेक्षा ठेवून होता, पण व्यर्थ.
मीही त्याला अपवाद नव्हतो......
शिक्षण आटोपून ती निघून गेली. ....
नंतर असं समजलं की,
कुणातरी एकावर तिचं अव्यक्त प्रेम होतं
..आणि अजूनही ती त्या प्रेमाच्या आशेवर अविवाहीत जीवन जगत होती. ...
आज त्या गोष्टीला चाळीस वर्षं झालीत. ..
आम्ही नोकऱ्या करून रिटायर झालो ...
आणि फेसबुकवर टाईमपास करू लागलो....
आणि एक दिवस अचानक.....
तिची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ...
सोबत मेसेज....
"काश, उस वक्त इजहार किया होता..
तो आज हम तनहा ना होते.."
छातीत धडधड सुरु झाली....
"मीच कां तो अव्यक्त प्रेमवाला?"
हातपाय थरथरू लागले..
बी.पी. वाढल्यासारखं वाटलं...
बायकोनं निंबू शरबत आणून दिलं.
थोडी तरतरी आली अन् लगेच...
फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली.
मग दोन महिने निव्वळ चॅटिंग एके चॅटींग...
"तुझी बायको कशी आहे? "
"खूपच छान."
"ती स्वयंपाक कसा करते? "
"एकदम झकास."
"तिचा तुला कंटाळा आला कां?"
"ती तर माझी जगण्याची प्रेरणा आहे."
"तुला जर मी प्रपोज केलं, तर तिला सोडशील कां?"
"पुढचे सत्तर जन्म तरी नाही."
"तिच्यांत असं काय पाहिलंस जे माझ्यात नाही?"
"ती माझं सर्वस्व आहे, माझा प्राण आहे."
एक दिवस तिनं मला एकांतात भेटायला बोलावलं.
मी चक्क नकार दिला. ...
"घरी ये, माझ्या सुगरण बायकोच्या
हातचं जेवण घे. ...
तुला देखील एका सर्वगुणसंपन्न स्त्रीचं दर्शन होऊन तू धन्य होशील."
तिनं रागानं मला अनफ्रेंड केलं....
संध्याकाळी बायकोनं सुग्रास फाईव्हस्टार बेत केला...
म्हणाली,
"तुमची ती फ्रेंड येणार आहे जेवायला."
मी पुन्हा बी.पी.ची गोळी अन् शरबत घेतलं....
शेवटी तिनंच सांगितलं,
"मीच होती तुमची ती फ्रेंड.
तुमची परीक्षा पाहिली.
अगदी बोर्डातून मुलांमध्ये पहिले आले, बरं कां?"......
मनांत म्हटलं,
"तू काय सांगतेस वेगळं?
पहिल्याच दिवशी तुझा फोन चेक करून तुझी फेसबुक चॅटींग चेक केली..
म्हणून वाचलो. नाहीतर.........."
दूर कुठेतरी लता चं गाणं सुरु होतं.....
चांद मिलता नही सबको संसार में
है दिया ही बहोत रोशनी के लिये.....