Bluepad | Bluepad
Bluepad
विठू विठू मन💐
सतीश लोंढे
सतीश लोंढे
23rd Jun, 2022

Share

तुझी माझी भूक एका भाकरीत बांध
डोळ्यात आसव पुन्हा ओघळू दे आज
संसार तुझा माझा कश्या आणा भाका साऱ्या
जीवनाच्या फेऱ्या मध्ये आज गेल्या माझ्या वाऱ्या
पाऊस भरपूर झाला, सार पिकल शिवार
बघायला नाही धनी आज सुन घर दार..
असा पाऊस पाऊस डोळ्या मधून ग वाहे
भुक्या लेकराला माझ्या दूध आटल ग माये
नीज उपाशी पोटी रात्र सरता सरना
शेतकरी राजा माझा कष्ट हरता हरेना
बा विठ्ठला वारी तुझी चुकली दोन येळा
सारा नियती चा खेळ आज फुलव तू मळा
तुझ्या दर्शनाची आस लागे आज मायबापा
उभ्या जगताचा बाप आस लावूनि बैसला ...
माणूस म्हणून विठू दिला तू आधार
नाही चुकायची वारी जर थांब एक पार
विठू विठू मन करे चंद्रभागा काठी
माय रुक्मिणी मोठी सदा राहतेस पाठी
तुला दंडवत माझा कर जोडुनी मी केला
सुखी ठेव देवा इथला प्रत्येक बळी राजा..
सतीश लोंढे✍️✍️✍️✍️
-------

185 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad