Bluepad | Bluepad
Bluepad
मनदिप
मनीषा शंकर कबाडे
23rd Jun, 2022

Share

* मनदीप *
जळमटे जुन्या विचारांची,
दूर फेकून दे आता,
नव्याने जगायला शिक तू
नको पाहू वळूनी आता ........
पिता शंकरचा लाभला ,
वरदहस्त कायमचा
आशिर्वाद कायम असे
डोईवर सुषमाताईचा ........
जगाचे भय ते कशाला ,
वास्तवात जग आता
पाहीजे स्विकारायला
आनंदाचे पर्व आता .......
युगानुयुगे अंखड तेवत ,
निशेचा दिप राहो
मनदीपचा संसार हा
सुखानंदमय राहो.......
कवयित्री : मनिषा शंकर कबाडे
जवळे- सांगोला

229 

Share


Written by
मनीषा शंकर कबाडे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad