Bluepad | Bluepad
Bluepad
मानवी जीवन विस्कळीत होतो पूरांमूळे
एकनाथ बडवाईक,
एकनाथ बडवाईक,
23rd Jun, 2022

Share

लेखक :- एकनाथ बडवाईक
दिनांक :- २३/०६/२०२२
मानवी जीवन विस्कळीत होतो पूरांमूळे
पूर म्हणजे काय :-
नदी आणि नाले जेव्हा दुथडी ची मर्यादा ओलांडून वाहू लागतात तेंव्हा पूर आला असे म्हणतात.
पूर ही नैसर्गिक आपत्ती :- पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे. जेव्हा अतिवृष्टी किंवा ढगफुटी होते तेव्हा नदी आणि नाले आपली मर्यादा ओलांडून वाहू लागतात आणि पूर येतो.पूर ही महाभयंकर समस्या आहे.पूर आल्या नंतर जी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे मानवी जीवन विस्कळीत होते.जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी लागतो.
पूर येण्याआधी काय करावे :-
पूराची कारणे :-
पूराची मुख्यतः दोन प्रकारची कारणे आढळतात.
१.नैसर्गिक कारणे :- भूकंप , अतिवृष्टी आणि ढगफूटी , उष्णतेमुळे हिमालयावरील बर्फ वितळणे .
२.मानवनिर्मित कारणे :- धरणं फुटणे आणि मानवी कृतीने नदी नाल्यांची पात्रे अरूंद आणि उथळ होणे.
पूराचे वाईट परिणाम :-
१. जीवितहानी
२. वित्त हाणी
३. रोगराई
४.दळणवळण समस्या
५. विज समस्या
६. पिण्याच्या पाण्याची समस्या
पूराचे चांगले परिणाम :-
१ . पाण्याची भूजल पातळी वाढते.
२. पूर्ण क्षेत्रात गाळाची माती साचून जमिन सुपिक होते .
पूरापासून संरक्षण मिळण्यासाठी काय दक्षता घ्यावी :-
१. पूर येण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता :- पूर प्रवण क्षेत्रातील लोकांनी खालील दक्षता घ्याव्यात.
१. आपल्या घरचे मौल्यवान साहित्य उंच भागावर सुरक्षित करून ठेवावे.
२. शासकीय यंत्रणेने द्वारा गावातील किंवा शहरातील नाल्यां मधील कचरा पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफ करून पावसाचं पाणी कुठे अडणार नाही. याची काळजी घ्यावी. सदर साफसफाई नुसती कागदावर होऊ नये तर ती प्रत्यक्षात व्हावी ही अपेक्षा.
३. आपलं वस्ती स्थान सखल भागात असेल तर पुराचं पाणी चढण्यापूर्वी जवळच्या उंच स्थानाकडे जावे. अशावेळी शासनाने नावेची व्यवस्था करावी आणि प्रभावित लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवावे.
४. आज-काल प्लास्टिकच्या पिशव्या आणि बॉटल्स यामुळेच नाल्या तुंबतात त्यामुळे हा प्लास्टिकचा कचरा वाढणार नाही यासाठी प्लास्टिक वापराविषयी चा कायदा काटेकोरपणे राबविण्यात यावा आणि कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांचेवर दंडात्मक कारवाई करावी.
५. पूरप्रवण क्षेत्रात पुरा विषयी जनजागृती करावी.
२. पूर आल्यानंतर घ्यावयाची दक्षता :-
१. पूरप्रवण क्षेत्रातील मानवी वस्त्यांमध्ये अधिक काळ पाणी साचून राहणार नाही याची शासनाद्वारे दक्षता घेण्यात यावी.
२. पूरप्रवण क्षेत्रात पूर्व सरल्यानंतर अतिशीघ्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छतेचे कार्य हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावे त्यामुळे रोगराई पसरणार नाही.
३. पुर प्रवण क्षेत्रातील पूर ओसरल्यानंतर आरोग्य विभागाने फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था करून लोकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात.
अशाप्रकारे सर्व स्तरावरून पूर व्यवस्थापनासाठी कार्य करणे अपेक्षित आहे. कोणत्याही विभागाने आपल्यावरील जबाबदारी न झटकता आपले कार्य जबाबदारीने वेळीच पूर्ण करावे. पुरामुळे कमीत कमी व्यक्ती प्रभावित होतील यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रभावित व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य या सुविधा ताबडतोब आणि वेळेवर पोहोचविण्याची व्यवस्था शासनाद्वारे करण्यात यावी.
माणसावर येणाऱ्या आपत्ती मग त्यांना नैसर्गिक असोत किंवा मानवनिर्मित असोत याचे मूळ कारण हे लोकसंख्या वाढ हेच आहे. आपल्या सूर्यमालेतील ग्रहां पैकी फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टीचे अस्तित्व आहे. आपल्या पृथ्वीवर जवळपास 75% भाग पाण्याने व्यापलेला आहे. जवळपास 25% भूभाग उपलब्ध आहे. दररोज लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मानवासाठी उपलब्ध असणारा दरडोई भूभाग क्षेत्र दिवसेंदिवस कमी कमी होत जात आहे. त्यामुळे शासनाद्वारे लोकसंख्या विषयक धोरणांवर विचार विनिमय करून लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्यास मानवावर येणाऱ्या आपत्ती काही प्रमाणात कमी करता येऊ शकतील.

176 

Share


एकनाथ बडवाईक,
Written by
एकनाथ बडवाईक,

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad