Bluepad | Bluepad
Bluepad
खरंच मानव बुद्धीमान आहे ?
Shrikrishna Savargaonkar
Shrikrishna Savargaonkar
23rd Jun, 2022

Share

🙏🚩॥ ❤️॥🚩🙏 माणूस हा सर्वांत बुद्धीमान आहे . नरदेह सर्वश्रेष्ठ आहे . हे सर्वांना अगदी लहान मुलास सुद्धा ठाऊक आहे. तसा पाठ वा शिकवण त्याला लहान पणा पासून दिली जाते ' शाळेतपण हेच शिकवतात . पुढे परमार्थात सुद्धा नरदेह श्रेष्ठ सांगतात . खरंच आपण प्रत्येक आपला बुद्धीमान आहे का तसेच आपण आपला नरदेह हा श्रेष्ठत्वास नेतो का? माणसाने बुद्धीमान होण्यासाठी अभ्यास करुन सखोल ज्ञान मिळवले पाहिजे . त्याचा उपयोग सत्कर्मा करता केला पाहिजे . त्याच बरोबर सदगुणांचा अंगिकार केला तर तो किमान स्वतः पुरता बुद्धीमान हितकारक ठरू शकतो ' नर देह हा परोपकारासाठीच झिजवला तर तो श्रेष्ठ ठरु शकतो . त्या साठी कठोर प्ररिश्रम करावे लागतात . निस्वार्थ पणे परोपकार करावा लागतो . महान थोर संतांचा चरित्रांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे . पण लहान पणा पासून बुद्धीमान ठरवल्याने तो मनमानी करून स्वतःचे पर्यायाने कुदुंबाचे समाजाचे अहितच करतो . तीच गोष्ट परमार्थाची प्रत्येकात देव आहे , तर मग तो माझ्यात पण म्हणतो . मनमानी क्रुर वा अयोग्य कर्म करुन देव करतो म्हणून चालेल का ? जागे व्हा ! जीवनाचे सार समजून घ्या |ज्ञान मिळवा । उन्नत आदर्श जीवन जगा ! जीवनमूल्यांची जोपासना करा ! भक्ति करा ! निर्भय व्हा ! ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ श्रीकृष्ण सावरगांवकर 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

182 

Share


Shrikrishna Savargaonkar
Written by
Shrikrishna Savargaonkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad